मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|शतश्लोकी|
श्लोक १४

शतश्लोकी - श्लोक १४

’शतश्लोकी’ हा गुरु-शिष्य संवादात्मक आत्मज्ञानाचा उपदेश करणारा ग्रंथ


नैर्वेद्यं ज्ञानगर्भं द्विविधमभिहितं तत्र वैराग्यमाद्यं
प्रायो दुःखावलोकाद्भवति गृहसुहृत्पुत्रवित्तैषणादेः ।
अन्यज्ज्ञानोपदेशाद्यदुदितविषये वांतवद्वेयता स्यात्प्रव्रज्यापि
द्विधा स्यान्नियमितमनसां देहतो गेहतश्च ॥१४॥

अन्वयार्थ-‘वैराग्य नैर्वेद्यं ज्ञानगर्भं चि इर्ति द्विविधं अभिहितं-’ वैराग्यं नैर्वेद्य आणि ज्ञानगर्भ असे दोन प्रकारचें आहे. ‘तत्र आद्यं वैराग्यं प्रायः गृहसृहृत्पुत्रवित्तैषणादेः दुःखावलोकात् भवति-’
त्यापैंकीं पहिलें जें नैर्वेद्यनांवाचें वैराग्य तें बहुत करून गृह, सुहृत्, पुत्र, वित्त इत्यादिकांच्या इच्छेमुळें प्राप्त होणार्‍या दुःखाचा अनुभव आला असतां होतें. ‘अन्यत् ज्ञानोपदेशात् भिवर्तिें-’ दुसरें जें ज्ञानगर्भनांवाचें वैराग्य तें ज्ञानोपदेशामुळें प्राप्त होतें. ‘यत् उदितविषये वान्तवत् हेयता स्यात्-’ ज्यामुळें पुत्रादिकविषय प्राप्त झाले असतां ते वान्तीप्रमाणें त्याज्य होतात. ‘तिर्थों नियमितमनसां प्रव्रज्या अपि देहतः च इति द्विधा स्यात्-’ तसेंच, आत्मसंयमी लोकांचा देहापासून व ग्रहापामून असा संन्यास सुद्धां दोन प्रकारचा आहे. िआचार्य या चवदाव्या श्लोकांत दोन प्रकारचें वैराग्य सांगतात. वैराग्य हा ज्ञानाचा उपाय आहे. तें वैराग्य दोन प्रकारचें सांगितलें आहे. त्यांतील एकाला नैर्वेद्य ह्मणजे दुःखापासून उत्पन्न झालेलें व दुसर्‍याला ज्ञानगर्भ म्हणजे ज्ञानमाहात्म्यानें प्राप्त झालेलें असें ह्मणतात. पहिलें ेजं नैर्वेद्य, तें गृह, सुहृत, पुत्रैषणा इत्यादिकांपासून बहुतकरू प्राप्त होणार्‍या दुःखामुळें उत्पन्न होतें. दुःख होऊं  नये म्हणून विंचू, साप इत्यादिकांना जसा कोणी स्पर्श करीत नाहीत, त्याचप्रमाणें परिणामी ज्यांच्यापासून दुःख होतें अशा पुत्रवित्तादिकांचे ठिकाणी विचारवान् पुरुष आदर ठेवीत नाहींत आणि यदाकदाचित् त्यांचा त्यांविषयीं प्रथम आदर असला, तरी मग ते तो मोठ्या प्रयत्नानें सोडितात. दुसरें जें ज्ञानगर्भ वैराग्य, तें केवळ ज्ञानोपदेशानें उत्पन्न होतें. प्रथमतः गृह, पुत्र इत्यादिक दुःखमय आहेत, असा अनुभव आल्यानें वैराग्य होतें असें सांगून, आतां आत्म्याहून भिन्न असलेलें सर्व अनात्मजात दुःखरूप आहे असा गुरुपदेश झाल्यानें पूर्वोक्त विषय वान्तीप्रमाणें त्याज्य होतात, असें सुचविलें आहे. ज्याप्रमाणें वान्ति झाली असतां पुनः तिचें भक्षण करावें अशी इच्छा होत नाहीं, त्याप्रमाणेच विषय हे अत्यंत नीरस आहेत असें ज्ञान झालें असतां विवेकी पुरुषाला पुनः ते ग्रहण करण्याची इच्छा होत नाहीं. योगवासिष्ठामध्यें ‘‘बुध्वाप्यत्यन्तवैरस्यं यः पदार्थेषु दुर्मतिः । बध्नाति वासनां भूयो नरो नासौ स गर्दभः’’ जो मूढ पुरुष हे सर्वही सृष्ट पदार्थ अत्यंत नीरस आहेत असें जाणूनही पुनः त्यांच्या ठिकाणीं दृढ वासना ठेवितो तो मनुष्यनव्हे तर गर्दभ होय, असें सांगितलें आहे. संन्यासही दोन प्रकारचा आहे. एक स्त्री, पुत्र, वित्त इत्यादिकांचा त्याग करून शास्त्रोक्त रीतीनें गृहांतून निघून संन्यास करणें, व दुसरा देहविषयक अभिमानाचा संन्यास होय. सारांश शिखासूत्राचा त्याग करून, भगवीं वस्त्रें धारण करून, सर्व लौकिक स्वत्वाचा त्याग करून, यतिधर्मानें कोठें तरी रहाणें या आश्रम संन्यासाला गृहतः संन्यास, व गृहादिकांप्रमाणेंच प्रत्यक्ष स्वशरीराच्या ठिकाणचाही अभिमान सोडून विदेहावस्थेमध्यें रहाणें याला देहतः संन्यास असें म्हणतात] १४.


References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP