शतश्लोकी - श्लोक २८
’शतश्लोकी’ हा गुरु-शिष्य संवादात्मक आत्मज्ञानाचा उपदेश करणारा ग्रंथ
नायति प्रत्यगात्मा प्रजननसमये नैव यात्यन्तकाले
यत्सोऽखंडोऽस्ति लैंगें मन इह विशति प्रव्रजत्यूर्ध्वमर्वाक् ।
तत्कार्श्यं स्थूलतां वा न भजति वपुषः किंतु संस्कारजातैस्तेजोमात्रा
गृहीत्वा व्रजति पुनरिहायाति तैस्तैः सहैव ॥२८॥
अन्वयार्थ-‘प्रत्यगात्मा प्रजननसमये न आयाति । अंतकाले च न एव याति-’ सर्वान्तर्यामी आत्मा उत्पत्तिकालीं येत नाहीं, व मरणसमयीं जातही नाहीं. ‘यत् सः अखण्डः अस्ति-’ कारण तो खण्डरहित आहे. ‘इह ऊर्ध्व अर्वाक् वा लैंगं मनः विशति (तथा च) प्रव्रजति-’ ह्या व्यवहारांत, देवलोकीं किंवा मनुष्यलोकीं, पंधरा कलांनी युक्त असलेलें मनच गर्भामध्यें शिरतें (व शरीर टाकून) जातें. ‘तत् वपुषः कार्श्यें स्थूलतां वा न भजति-’ तें मन देहाच्या । कृशतेनें किंवा स्थूलतेनें कृश किंवा स्थूल होत नाहीं. ‘किंतु संस्कारजातैः सह तेजोमात्राः गृहीत्वा व्रजति पुनः इह तैः सह एव आयाति-’ पण (तें मन मरणसमयीं) सर्व पूर्व संस्कारांसह दशेंद्रियें व प्राण यांतील सूक्ष्म तेजें खेंचून घेऊन जातें; व पुनः जन्मकालीं त्या त्या वासना व इन्द्रियांदिकांचीं सूक्ष्म तेजें घेऊनच गर्भोत तें येतें. जिन्ममरणद्वारा विचार केला तरी सुद्धां जीव पृथक् नसून स्वरूपभूतच आहे; असें आतां वर्णन करितात- प्राणी जन्मास येतो त्यावेळीं आत्मा कोणीकडून तरी येऊन गर्भोत प्रवेश करितो व मरणसमयीं तो शरीर सोडून कोठें तरी जातो असें सर्व प्राकृत मनुष्यांना वाटण्याचा संभव आहे, पण वस्तुतः तसें होत नाहीं. कारण ब्रह्मरूप आत्मा आकाशाहूनही अति सूक्ष्म व अति विस्तृत आहे. सर्व भूतांना आधार असणारें आकाश, सर्वांहून विस्तृत व सूक्ष्म असल्यामुळें, जर चलनवलन करूं शकत नाहीं; तर मग त्याहूनही अति विस्तृत व सूक्ष्म असणारें ब्रह्म कोठें जात नाहीं किंवा कोठून येत नाहीं हें काय सांगावे? जाणें, येणें स्तब्ध रहाणें, इत्यादि क्रिया परिमित (मोज-माप करितां येण्यासारख्या, आकारयुक्त) वस्तूच्या ठिकाणींच संभवतात. अखंड आत्मा सर्वव्यापी असल्यामुळें कोठें जात नाहीं व येत नाहीं. ऊर्ध्वलोकीं जन्म घेतांना वासना, आणि पांच प्राण व दहा इंद्रियें, यांसह मन (अंतःकरण) गर्भात प्रवेश करितें व तेंच मरणकालीं देह सोडून जातें. तें लिंगदेहात्मक मन रोगादिकांनीं देह कृश झाला तरी कृश होत नाहीं, व रसायनादि पौष्टिक औषधींच्या योगानें तो पुष्ट झाला तरी तें पुष्ट होत नाहीं. ह्म. कृशता, पुष्टि, दृढता इत्यादि धर्म देहाचे आहेत, मनाचे नव्हेत. देहत्याग करण्याची वेळ आली असतां मन, पूर्व अनेक जन्मांतील व प्रस्तुत जन्मांतील संचित संस्कार, वासना, आणि इंद्रियें व प्राण यांची तेजें (त्यांतील ती ती शक्ति) घेऊन निघून जातें; व पुनः जन्माच्या वेळीं तेंच सर्व पूर्वसंस्कार व तेजोमात्रा (इंद्रियादिकांच्या शक्ति) यांसह गर्भांत प्रवेश करितें]२८.
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP