शतश्लोकी - श्लोक २३
’शतश्लोकी’ हा गुरु-शिष्य संवादात्मक आत्मज्ञानाचा उपदेश करणारा ग्रंथ
तुच्छत्वान्नसदासीद्रगनकुसुमवद्भेदकं नो सदासीत्
किंत्वाभ्यामन्यदासीव्द्यवहृतिगतिसन्नास लोकस्तदानीम् ।
किंत्वर्वागेव शुक्तौ रजतवदपरो नो विराड् व्योमपूर्वः
शर्मण्यात्मन्यथैतत्कुहकसलिलवत्किं भवेदावरीवः ॥२३॥
अन्वयार्थः-‘गगनकुसुमवत् तुच्छत्वात् असत् न आसीत्-’
(सृष्टीच्या उत्पत्तीपूर्वीं) आकाशांतील पुष्पाप्रमाणें तुच्छ असणारें असत् नव्हतें ‘भेदकं (च) सत् नो आसीत । किंतु आभ्यां अन्यत् आसीत्-’ व भेद करणारें सत्ही नव्हतें. पण ह्या दोघांहूनी अन्य असें होतें. ‘तदानीं लोकः व्यवहृतिगतिसन् न आस-’ व्यावहारिक सत् सुद्धां त्या काळीं नव्हतें. ‘अपरः व्योमपूर्वः विराट् नो-’ आकाश व त्याचें कार्य विराट्, ह्यांतीलही कांही नव्हतें. ‘किंतु शुकितरजतवत् अर्वाक् एव-’ परंतु शिंपीच्या निमित्तानें तिच्या ठिकाणीं जसें रूपें भासावें, तसें हें सुष्टीनंतरच (सर्व भासत आहे.) ‘अथ शर्मणि आत्मनि कुहकसलिलवत् आवरीवः भवेत्
किं नित्यर्थर पण शुद्ध ब्रह्माला मृगजलासारखें हें जगत् झांकील काय? (कधींही नाहीं,) नारमरूपात्मक व प्रत्यक्ष दिसणार्या जगाचें उपादान कारण काय असावें? असा विचार करूं लागलें असतां शुद्ध व निष्क्रिय ब्रह्म कधींही जगाचें कारण होणार नाहीं; असें वाटतें. बरें, ब्रह्माहून अन्य असें कांहीं जगाचें कारण असावें अशी कल्पना केल्यास तें सत् (भूत, भविष्यत्, वर्तमान कालीं राहणारें,) कीं असत् (कांहीं काल भासणारें) आहे; अशी शंका येते. यास्तव त्याचा निर्णय या श्लोकांत केला आहे. ज्या द्रव्याचें कार्य झालेलें असतें, तें द्रव्य त्या कार्याचें उपादान करण होय. मातीचा घट, माती ह्या द्रव्यानें बनविलेला असतो; ह्मणून ती घटाचें उपादान कारण आहे. तसेंच ह्या जगाचें उपादान कारण काय असावें? आकाशाच्या पुष्पांप्रमाणें किंवा मनुष्याच्या शिंगाप्रमाणें कधींही नसणारें असत् (म्हणजे शून्य) या सद्रूपानें भासणार्या जगाचें कारण होऊं शकणार नाहीं. बरें, सत् असें कांहीं जगाचें कारण ह्मणावें तर सद्रूप असा एक नित्यशुद्धबुद्धमुक्त स्वभाव परमात्माच आहे; अन्य कांहींही सत् नाहीं, असा श्रुतिसिद्धान्त आहे; व जगाचें कारणही सत् आहे असं मानल्यास तें सत् ब्रह्मस्वरूपामध्यें भेद पाडील ह्मणजे श्रुतिविरुद्ध शुद्ध ब्रह्माहून पृथक् असें एक निराळेंच जगाचें कारण ‘सत्’ आहे असें होऊं लागेल. पण तें इष्ट नाहीं. ह्मणून ब्रह्मस्वरूपांत भेद पाडणारें सत्ही जगाचें कारण नव्हे. तर सत् व असत् ह्यांहून विलक्षण असें जगाचें कारण आहे. कार्याच्या पूर्वी कारण असतें; हें सुचविण्याकरितां लोकांमध्यें ‘आसीत्’ इत्यादि भूतकालिक क्रियापदें योजून जगाचें पूर्वरूप (कारण) सदसत्पेक्षां विलक्षण होतें असें प्रतिपादन केलें आहे. पारमार्थिक सत् जरी पूर्वी नसलें तरि व्यावहारिक सत् तरी तेव्हां असेल असें कोणी ह्मणतील; म्हणून व्यावहारिक सत्ही जगाच्या उत्पत्तीपूर्वी नव्हतें, ह्मणजे त्याकालीं (सृष्टीच्या पूर्वी) व्यवहार नव्हता. तो ह्या स्थित्यवस्थेमध्येंच आहे, असें आचार्य ‘व्यवहृतिगति-’ इत्यादि पदांनीं सांगतात आतां यावर-जरी कदाचित् साकार असें त्यावेळीं कांहीं नव्हतें तरी निराकार आकाश व आकाशादिभूतांपासून होणारा विराट् तरी असेल-अशी तार्किक शंका घेतील; म्हणून आकाश, विराट् इत्यादि कांही नव्हतें असें अनेक श्रुतींना अनुसरून आचार्यांनीं येथें सांगून ठेविलें आहे. पुनः यावरपूर्वी नसून हें जगत् मध्यें कां उत्पन्न झालेलें असेना पण तें शुद्ध ब्रह्माहून पृथक् असल्यामुळें त्या ब्रह्माला आच्छादित तरी करील म्ह त्याचें ज्ञान होऊं देणार नाहीं असें कोणी ह्मणेल म्हणून, चवथ्या चरणांत त्याचाही निषेध केला आहे. ज्याप्रमाणें माळ जमिनीवर भ्रमानें जलाचा भास होतो पण तो भ्रम नष्ट झाल्यावर त्या भूमीला तें भासणारें जल आच्छादित करीत नाहीं, त्याप्रमाणें शुद्ध ब्रह्मालाही हें मायेनें कांहीं काल भासणारें जगत् आवृत करूं शकत नाहीं.] २३.
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP