पूर्णात्मानात्म्भेदात्त्रिविधमिव परं बुद्ध्य़वाच्छिन्नमन्यत्तत्रैवाभासमात्रं
गगनामिव जले त्रिप्रकारं विभति ।
अभ्भोवच्छिन्नमस्मिन्प्रतिफलितमतः पाथसोंतर्बहिश्व
पूर्णावच्छिन्नयोगे व्रजति लयमविद्या स्वकार्यैः सहैव ॥५४॥
अन्वयार्थ-‘अभ्भोवच्छित्रं-’ पाण्यानें वेष्टित होऊन तेवढेंच निराळें भासणारें, ‘अस्मिन् प्रतिफलितं-’ पाण्यांत प्रतिबिंबित झालेलें व ‘अतः पाथसः अंतर्बहिः च-’ त्या पाण्याला आंतून व बाहेरून व्यापणारें ‘इति जले त्रिप्रकारं गगनं इव-’ असें जलांत तीन प्रकारचें आकाश जसें भासतें; ‘परं बुद्ध्य़ंवच्छिन्नं अन्यत्तत्रैव आभासमात्रं इति इह पूर्णात्मानात्मभेदात (ब्रह्म) त्रिविधं आभाति-’ तसेंच, एक पूर्ण, दुसरें बुद्ध्य़वच्छिन्न व तिसरें बुद्धींतच प्रतिबिंबित झालेलें असें ब्रह्महि पूर्ण, आत्मा व अनात्मा अशा तीन भेदांनीं तीन प्रकारचें भासतें. ‘(एवं) पूर्णावच्छिन्नयोगे (सति) अविद्या स्वकार्यैं सह एव लयं व्रजति-’ (ह्याप्रमाणें) पूर्ण व उपाधिव्यापि अशीं हीं दोन्हीं तत्त्वें एकच आहेत, असें अखण्ड ज्ञान झालें कीं, आपल्या कार्यासहवर्तमानच अविद्या नाश पावते.उपाधीमध्येंच तीन प्रकारची ब्रह्मप्रतीति येते, असें भगवान् आचार्य ह्या श्लोकांत सांगतात-ह्या अंतःकरणरूप जीवाच्या उपाधीमध्यें सर्वव्यापि पूर्ण परब्रह्म, आत्मा व अनात्मा अशा तिघांचाहि भास होतो. त्यांतून पहिलें जें परिपूर्ण ब्रह्म तें उपाधीच्या आंत बाहेर ओतप्रोत भरलेलें असतें; दुसरें अंतः- करणवेष्टित झाल्यानें तेवढेंच पूर्ण ब्रह्मापासून पृथक् होऊन केवळ बुद्धीलाच व्यापून राहतें व तिसरें बुद्धीमध्यें केवल प्रतिबिंबासारखें भासतें. हीच गोष्ट जास्त स्पष्टपणें लक्ष्यांत यावी म्हणून उदकांमध्यें तीन प्रकारांनीं भासणार्या गगनाचा दृष्टांत देतात-जलाला अंतर्बथ्हर् व्यापून राहणारें, जल जेवढें असेल तेवढेंच पूर्णाकाशाहून पृथक् भासणारें, व त्यांत प्रतिबिंबित होणारें असें एकच आकाश जसें उपाधीमुळें तीन प्रकारचें भासतें, तसेंच एक परब्रह्म उपाधीमुळें तीन प्रकारचें होतें, पण ज्ञानाच्या योगानें त्यांच्या अखंडत्वाचा (ह्मे तिन्ही ठिकाणीं भासणारें तत्त्व एकच आहे असा) निश्चय झाला कीं, तत्क्षणींच उपाधिभूत अविद्या आपल्या प्रतिबिंबादिक कार्यांसह स्वाश्रयामध्यें जाऊन मिळते. अधिष्ठानाचा साक्षात्कार झाला असतां भ्रम नाहींसा होतो] ५४.