रूपं रूपं प्रतीदं प्रतिफलनवशात्प्रातिरूप्यं प्रपेदे ह्येको
द्रष्टा द्वितीयो भवति च सलिले सर्वतोनंतररूपः ।
इन्द्रो मायाभिरास्ते श्रुतिरिति वदाति व्यापकं ब्रह्म
तस्माजीवत्वं यात्कस्मादतिविमलतरे बिभ्बितं बुद्ध्य़ुपाधौ ॥५०॥
अन्वयार्थ-‘इदं प्रतिफलनवशात् रूपं रूपं प्रति प्रातिरूप्यं प्रपेदे-’ हें ब्रह्म प्रतिबिंबाच्या योगानें उपाधीप्रमाणें निरनिराळ्या रूपांचें झालें; ‘एकःहि द्रष्टा सलिले द्वितीयः भवति-’ (जलाशयाचे तीरीं उभें राहून उदकांत) पहाणारा एकच पुरुष स्वतःचेंच रूप उदकामध्यें दिसूं लागल्यामुळें अनेक होतो; ‘इन्द्रः मायाभिः सर्वतः अनंतरूपः आस्ते इति च श्रुतिः वदति-’ व इंद्र मायेच्या योगानें अनंत रूपें घेतो असें श्रुति सांगते. ‘तस्मात् व्यापकं ब्रह्म अति विमलतरे बुद्ध्य़ुपाधौ बिंबितं अकस्मात् जीवत्वं याति-’ तस्मात् सर्वव्यापी ब्रह्मच अति निर्मल अशा बुद्धिरूप उपाधीमध्यें बिंबित झालें असतां तत्क्षणींच जीव होते. िआतां ह्या श्लोकामध्यें ‘एकच बिंब अनेक प्रतिबिंबांमध्यें व्यापून असतें’ ह्या न्यायानें आत्म्याचें सर्वात्मकत्व दाखवितात. ह्या ठिकाणीं ‘‘’दध्यङ् आथर्वणे’’ ‘‘सलिल एको द्रष्टो’’ ‘‘इंद्रो मायाभिःे’’ ह्या प्रतिबिंबविषयक तीन श्रुतींचा निर्देश केला आहे. ब्रह्म ज्या ज्या उपाधीमध्यें प्रतिबिंबित झालें त्या त्या प्रमाणें भासूं लागलें. ह्या पहिल्या श्रुतीविषयीं वेदांत अशी आख्यायिका आहे कीं, पूर्वीं देवांचे अश्विन नांवाचे दोन वैद्य आत्मज्ञानाचा उपदेश घेण्याकरितां दधीचि ऋृषीकडे गेले व ‘आह्मांस आत्मविद्येचा उपदेश करा,’ अशी त्यांना त्यांनीं विनंति केली. त्यावर दधीचि ऋषींनीं पुनः केव्हां तरी उपदेश करीन असें उत्तर दिलें. तें ऐकून ते उभयतां स्वस्थानीं निघून गेले. इतक्यांत इंद्र दधीचीकडे आला व माझ्या वैद्यांना तुम्ही उपदेश करूं नका, आणि जर हें माझें ह्मणणें अमान्य करून तुम्हीं उपदेश कराल, तर मी तुमचा शिरश्छेद करीन, असें बोलून निघून गेला. तदनंतर कांहीं कालानें ते उभयतां वैद्य पुनः दधीचीकडे आले असतां त्यानें झालेला वृत्तांत सांगितला. तो ऐकून ते वैद्य ह्मणाले की, महाराज, आपण पुनः केव्हां तरी उपदेश करीन असें जें सांगितलेंत तें असत्य होणें योग्य नाहीं. याकरितां आम्हीं आपलें हें मस्तक कोठें तरी लपवून ठेवून येथें अश्वाचें शिर आणून बसवितों, त्या अश्वमुखानें आपण आम्हांस उपदेश करा. नंतर इंद्र आपला शिरश्छेद करून निघून गेला, ह्मणजे आम्ही आपलें मस्तकः पुनः जोडून देऊं हें त्याचें भाषण ऐकून दधीचि ऋृषींनी तसें करण्यास वैद्यांस अनुमोदन दिलें; आणि नंतर अश्वमुखानें त्यांनी त्यांना उपदेश केला. त्या उपदेशामध्यें ‘‘रूपं रूपं प्रतिरूपो बभूव’’
ही श्रुति आहे. नदीच्या किंवा जलाशयाच्या तीरीं एकच पुरुष उदकांतील प्रतिबिंबरूपानें आपणाला अनेकत्वानें पहातो. परमात्मा आपल्या मायाशक्तींच्या योगानें अनेकरूप झाला. सारांश सर्वव्यापि सर्व प्रतिबिंबांना व्यापून असणारे ब्रह्मच अति निर्मल बुद्धीमध्यें प्रतिबिंबित झालें असतां जीव होतें; व अनेक उपाधींमुळें त्याचे ठिकाणीं अनेकत्व येतें.]५०.