मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|शतश्लोकी|
श्लोक ३७

शतश्लोकी - श्लोक ३७

’शतश्लोकी’ हा गुरु-शिष्य संवादात्मक आत्मज्ञानाचा उपदेश करणारा ग्रंथ


पश्यन्त्याराममस्य प्रतिदिवसममी जन्तवः स्वापकाले
पश्यत्येनं न कश्चित्करणगणमृते मायया क्रीडमानम् ।
जाग्रर्त्थंव्रजानामथ च तनुभृतां भासकं चालकं वा
नो जानीते सुषुप्तौ परमसुखमयं कश्चिदाश्चर्यमेतत् ॥३७॥

अन्वयार्थ-‘अमी जनतवः प्रतिदिवसं स्वापकाले अस्य आरामं पश्यन्ति-’ हे सर्व प्राणी प्रत्येक दिवशीं निद्रित झाले असतां ह्या आत्म्याची क्रीडा (स्वप्नावस्थेंतील व्यवहार) पहातात; (परंतु) करणगणं ऋते मायया क्रीडमानं एनं न कश्चित् पश्यति-’ परंतु बाह्येंद्रियांचें साहाय्य घेतल्याशिवाय स्वप्नांतील देहेंद्रियरूपी मायेच्या योगानें व्यवहार करणार्‍या ह्या आत्म्याला कोणीही पहात नाहींत. ‘अथ जाग्रति अर्थव्रजानां भासकं तनुभृतां च चालकं वा (न पश्यति)’ तसेंच जागृतींतहि, सर्व विषयसमूहाचा भासक व सर्व प्राण्यांचा चालक, अशा आत्म्याला कोणीही पहात नाहीं; (तथा) सुषुप्तौ परमसुखमयं कश्चित् नो जानीते एतत् आश्चर्यं-’ ।(आणि पुनः तसेंच) सुषुप्तीमध्यें (म्हणजे स्वप्नरहित निद्रावस्थेमध्यें) अत्यंत सुखमय अशा आत्म्यालाही कोणी पहात नाहीं हें केवढें हो आश्चर्य आहे ! ! िआतां तिन्ही अवस्थांमध्यें आत्म्याचा प्रत्येकाला अनुभव येत असूनही, त्याचें कधीं कोणी विवेचन करीत नाहीं; ह्याविषयीं श्रीमत् आचार्य आश्चर्य प्रदर्शित करितात. तिन्ही अवस्थेंत आत्म्याचा, स्थूल व सूक्ष्म व्यवहारानें व अत्यंत आनंदवृत्तीनें सर्वांना अनुभव येत असूनही त्याला कोणी जाणीत नाहींत. इतकेंच नव्हे तर, त्याच्याविषयीं विचार करण्यासही कोणी तयार होत नाहीत. फार काय पण कित्येक ह्या लौकिक संपत्तीनें व विद्वत्तेनें मोहित होऊन सर्वांचा नियामक असा हा परमात्मा आहे किंवा नाहीं, ह्या विषयींच साशंक असतात; हें केवढें अज्ञान आहे] ३७.


Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP