यःसत्त्वाकारवृत्तौ प्रतिफलति युवा देहमात्रावृतोऽपि
तद्धर्मैर्बाल्यवाद्धर्य़ादिभिरनुपहतः प्राण आविर्बभूव ।
श्रेयान्साध्यस्तमेतं सुनिपुणमतयः सत्यसंकल्पभाजोऽप्यभ्यासाद्देवयंतः
परिणतमनसा साकमूर्ध्वं नयन्ति ॥४५॥
अन्वयार्थ-‘यः युवा वाकारवृत्तौ प्रतिफलति प्राणः आविर्बभूव-’ जो आत्मा अंतःकरणांत प्रतिबिंबित होतो, तोच प्राण होय.‘(सः)देहमात्रावृत्तः अपि तद्वर्मैः बाल्सवाद्धर्य़ादिभिः अनुपहतः सन् श्रेयान् साध्यः (अस्ति)-’ तो देहोंद्रियांनीं आच्छादित झालेला असला तरी त्यांच्या बाल्य, वार्द्धक्य इत्यादि धर्मांनीं लिप्त होत नसून कल्याणरूप व साध्य आहे. ‘तं सत्यसंकल्पभाजः सुनिपुणमतयः अपि अभ्यासात् देवयन्तः परिणतमनसा साकं ऊर्ध्वं नयन्ति-’ त्याला कुशल बुद्धीचे केवल ब्रह्माविषयींच संकल्प करणारे व अभ्यासानें देवत्वप्राप्ति करून घेण्याची इच्छा करणारे पुरुष एकाग्र अंतःकरणारसहवर्तमान ऊर्ध्वलोकीं (ब्रह्मरंध्रांत) नेतात. िआतां ह्या श्लोकामध्यें जीवन्मुक्ताचें मन व प्राणहि अधोगतीला न जातां ऊर्ध्व गतीला जातात, असें ऋग्वेदस्थ ‘‘युवा सुवासाः परिवीते’’ इत्यादि श्रुतीच्या आधारानें श्रीमत् आचार्य सांगतात-जो आत्मा पंचमहाभूतांच्या सत्त्वगुणांशांपासून उत्पन्न झालेल्या अंतःकरणांत प्रतिबिंबित होतो तोच जीव होय. तो देहेंद्रियांनीं वेष्टित झाला तरी बाल्य, यौवन इत्यादि देहधर्म व अंधत्व, बधिरत्व इत्यादि इंद्रियधर्म यांनीं लिप्त होत नाही. तो अत्यंत कल्याणरूप असून त्याची प्राप्ति करून घेतां येते (तद्रूप होतां येतें.) अशा त्या प्राणाला, सूक्ष्मबुद्धि पंडित, सत्य अशा ब्रह्माचे ठिकाणी मनोवृत्ति ठेवणारे उत्तम साधक, व पूर्वीं बेचाळीसावे श्लोकांत सांगितलेल्या द्विविध अभ्यासानें देवत्वप्राप्ति करून घेणारे मुमुक्षु, संस्कारांच्या योगानें अत्यंत निर्मल झालेल्या अंतःकरणासहवर्तमान ऊर्ध्वलोकीं नेतात म्हणजे सुषुम्नाडीच्याद्वारा ब्रह्मरन्ध्रांत नेतात]४५.