हेतुः कर्मैव लोके सुखतदितरयोरेवमज्ञोऽविदित्वा
मित्रं वा शत्रुरित्थं व्यवहरति मृषा याज्ञवल्क्यार्तभागौ ।
यत्कर्मैवोचतुः प्राक् जनकनृपगृहे चक्रतुस्तत्प्रशंसां
वंशोत्तंसो यदूनामिति वदति न कोऽप्यत्र तिष्ठत्यकर्मा ॥८३॥
अन्वयार्थ-‘लोके सुखतदितरयोः हेतुः कर्म एव-’ व्यवहारांतील सुखदुःखांचें कारण कर्मच आहे. ‘एवं अज्ञः अविदित्वा मित्रं शत्रुः वा इत्थं मृषा व्यवहरति-’ पण अज्ञ हें न जाणून ‘हा मित्र किंवा हा शत्रु’ असा उगाच व्यवहार करितो. ‘यत् प्राक् जनकनृपगृहे याज्ञवल्क्यार्तभागौ कर्म एव ऊचतुः तत्प्रशंसां (च) चक्रतुः’ कारण पूर्वीं जनकराजसभेंत याज्ञवल्क्य व आर्तभाग यांनीं (सुखदुःखाचें कारण) कर्मच सांगितलें व त्याची प्रशंसा केली. ‘अत्र कः अपि अकर्मा न तिष्ठति इति यदूनां वंशोत्तंसः (अपि) वदति-’ व्यवहारांत कोणीहि अज्ञ कर्म न करितां रहात नाहीं, असें
यदुकलश्रेष्ठहि सांगतो. आतां येथून पुढें कर्ममीमांसाप्रकरण लागलें. या श्लोकांत प्राण्यांच्या बर्यावाईट भोगाला त्यांचें कर्मच कारण आहे, असें निरूपण करितात. प्राण्यांच्या सुखःदुखांचें त्यांच्या कर्माहून दुसरें कांहींएक कारण नाहीं. पण अज्ञ प्राण्यांना हें समजत नाहीं. ते उगीच जगांत कांहीं पदार्थ इष्ट व कांही अनिष्ट मानितात. ज्यांच्यापासून सुख होतें ते भार्यापुत्रादि आप्त व ज्यांच्यापासून दुःख होते ते अनाप्त असें प्राणी मानितो. पण पूर्वीं जनकसभेंत मोठा वादविवाद करून याज्ञवल्क्य व आर्तभाग यांनीं ‘कर्म हेंच सुखादिकांचें कारण आहे’ असें ठरविलें व त्याचीच प्रशंसाहि केली. { बि. भा. अ. ३. ब्रा.२. ) शिवाय भगवान् गोपाळकृष्णांनीहि ‘एक क्षणभरसुद्धां कोणा अज्ञ प्राण्याला जगांत कर्म न करितां राहतां येत नाहीं’ (गी. भा. पृ. २७०) असें
स्पष्ट सांगितलें आहे.] ८३