मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|शतश्लोकी|
श्लोक ३३

शतश्लोकी - श्लोक ३३

’शतश्लोकी’ हा गुरु-शिष्य संवादात्मक आत्मज्ञानाचा उपदेश करणारा ग्रंथ


भुंजानः स्वप्नराज्यं ससकलविभवो जागरं प्राप्य भूयो
राज्यभ्रष्टोऽहमित्थं न भजति विषमं तन्मृषा मन्यमानः ।
स्वप्ने कुर्वन्नगम्यागमनमुखमघं तेन प प्रत्यवायी
तद्वज्जाग्रद्दशायां व्यवहृतिमखिलां स्वप्नवद्विस्मरेच्चेत् ॥३३॥

अन्वयार्थ-‘ससकलविभवः सन् स्वप्नराज्यं भुंजानःभूयो जागरं प्राप्य तन्मृषा मन्यमानः अहं राज्यभ्रष्टः इत्थं विषमं न भजति-’ सर्व वैभवासहवर्तमान स्वप्नांतील राज्याचा उपभोग घेणारा पुरुष, जागा झाला असतां तें स्वप्नराज्य मिथ्या आहे असें मानितो आणि त्यामुळें ‘मी आतां राज्यभ्रष्ट झालों’ असें समजून खेद करीत नाहीं. ‘स्वप्ने अगम्यागमनमुखं अघं कुर्वन् तेन प्रत्यवायी न (भवति)-’ तसेंच स्वप्नांत अगम्यागमनादि पातकें करणारा पुरुष त्या पातकांनीं दोषी होत नाहीं. ‘जाग्रदृशायां (अपि) अखिलां व्यवहृतिं स्वप्नवत् विस्मरेत् चेत् तर्हि तद्वत् (प्रत्यवायी न भवति)-’ जाग्रदवस्थेंतील सर्वही व्यवहार जर प्राणी स्वप्नाप्रमाणेंच विसरेल तर, तसाच दोषी होणार नाहीं. आतां स्वप्नाच्या दृष्टांतानें प्रपंच मिथ्या आहे असें निरूपण करितात. सैन्य, भांडार, आयुधें इत्यादि सामग्रीनें युक्त असलेल्या स्वप्नांतील वैभवशाली राज्याचा उपयोग घेणारा पुरुष जागा झाला असतां आपला पूर्वींचा तो दरिद्री देह व संसार पाहतो. पण तें स्वप्नांतील राज्य खोटें आहे असें समजत असल्यामुळें ‘मी आतां राज्यभ्रष्ट झालों’ असें मानून तो कधींही रडत बसत नाहीं. हीच गोष्ट आणखी एका दृष्टांतानें स्पष्ट करितात. स्वप्नामध्यें चांडालस्त्रीगमन, मद्यपान, ब्रह्मवध इत्यादि पातकें करणारा पुरुष जागा झाल्यावर पातकक्षालनार्थ प्रायश्चित घेण्यास पात्र होत नाहीं; व त्याला स्वप्नांतील पातक मिथ्या आहे असें वाटत असल्यामुळें खेदही होत नाहीं. त्याचप्रमाणें जाग्रदृशेंत केलेला सर्व पापपुण्यरूप व्यवहार स्वप्नांतील व्यवहाराप्रमाणेंच जर प्राणी विसरेल तर तो स्वप्नांतील पापपुण्याप्रमाणेंच ह्या जागृतींतील पापपुण्यात्मक व्यवहारानेंही लिप्त होणार नाहीं. कारण हे स्थूल व्यवहारही खोटे आहेत असेंच तो मानीत असतो. श्रीभगवानांनींही ‘ब्रह्मण्याधाय कर्माणि ’ सर्व कर्में ब्रह्मसमर्पण करून व त्यांविषयीं आसक्ति सोडून जो तीं करितो, तो पद्मपत्र जसें उदकानें लिप्त होत नाहीं, तसा पापानें लिप्त होत नाहीं. असें ह्मटलें आहे]३३.

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP