संस्कृत सूची|संस्कृत साहित्य|पुराण|मार्कण्डेयपुराणम्|
प्रस्तावना

मार्कण्डेयपुराण - प्रस्तावना

मार्कण्डेय पुराणात नऊ हजार श्लोकांचा संग्रह आहे.


मार्कण्डेय पुराण प्राचीन पुराणांपैकी एक आहे. हे लोकप्रिय पुराण मार्कण्डेय ऋषींनी क्रौष्ठिला ऐकवले होते. ह्या पुराणात ऋग्वेद पुराणाप्रमाणेच अग्नि, इन्द्र, सूर्य इत्यादी देवतांचे विवेचन आहे आणि गृहस्थाश्रम, दिनचर्या, नित्यकर्म ह्यांची पण चर्चा आहे. देवी भगवतीची विस्तृत महिमेचा परिचय देणार्‍या ह्या पुराणात दुर्गासप्तशती ची कथा आणि माहात्म्य, हरिश्चन्द्र ची कथा, मदालसा-चरित्र, अत्रि-अनसूया ची कथा, दत्तात्रेय-चरित्र इत्यादी अनेक सुन्दर कथांचे विस्तृत वर्णन आहे. ह्याचे मुख्य कारण असे की या पुराणात १३ अध्यायात देवी महात्म्याचे महनीय अंश आहेत, ज्यात देवीची त्रिविध रूपे - महाकाली,महालक्ष्मी आणि महासरस्वती च्या चरित्रांचे वर्णन मोठया विस्ताराने केले गेले आहे.

मार्कण्डेय पुराणात नऊ हजार श्लोकां (९०००) का संग्रह आहे. १३७ अध्यायाच्या ह्या पुराणात १ ते ४२ अध्याय पर्यंत वक्ता पक्षी आणि श्रोता जैमिनी आहे, ४३ ते ९० अध्यायात वक्ता मार्कण्डेय आणि श्रोता कृप्टुकि आहे तसेच यानंतरच्या भागाचे वक्ता सुमेधा आणि श्रोता सुरथ-समाधि आहे. मार्कण्डेय पुराण आकारमानाने छोटे आहे. ह्यात १३७ अध्यायांमध्ये जवळपास नऊ हजार श्लोक आहेत. मार्कण्डेय ऋषि द्वारा कथन केल्याने या पुराणाचे नाव 'मार्कण्डेय पुराण' पडले।
संक्षिप्त परिचय
ह्या पुराणात पक्ष्यांना प्रवचनाचे अधिकारी बनवून त्यांच्या द्वारा सर्व धर्मांचे निरूपण केले गेले आहे. मार्कण्डेय पुराणात पहिल्यांदा मार्कण्डेय ऋषींजवळ जैमिनिचे  प्रवचन आहे. नंतर धर्म संज्ञा पक्ष्यांची कथा सांगितली आहे. त्यानंतर त्यांच्या पूर्व जन्माची कथा आणि देवराज इन्द्राच्या कारणामुळे त्यांना शापरूप विकार प्राप्तिचे कथन आहे, त्यानन्तर बलभद्रजीची तीर्थ यात्रा, द्रौपदीच्या पांच पुत्रांची कथा, राजा हरिश्चन्द्रची पुण्यमयी कथा, आडी आणि बक पक्ष्यांचे युद्ध, पिता आणि पुत्राचे आख्यान, दत्तात्रेयची की कथा आणि महान आख्यान सहित हैहय चरित्र, अलर्क चरित्र, मदालसाची कथा, नऊ प्रकारच्या सृष्टिचे पुण्यमयी वर्णन, कल्पान्तकालचा निर्देश, यक्ष-सृष्टि निरूपण, रुद्र इत्यादिची सृष्टि, द्वीपचर्याचे वर्णन, मनुंच्या अनेक पापनाशक कथांचे कीर्तन आणि त्यातच दुर्गाजीची अत्यन्त पुण्यदायिनी कथा आहे जी आठव्या मन्वन्तर च्या प्रसंगात सांगितली आहे. तत्पश्चात तीन वेदांच्या तेजामुळे प्रणवची उत्पत्ति, सूर्य देवाच्या जन्माची कथा, वैवस्त मनुच्या वंशाचे वर्णन, वत्सप्रीचे चरित्र, त्यानन्तर महात्मा खनित्रची पुण्यमयी कथा, राजा अविक्षितचे चरित्र, किमिक्च्छिक व्रताचे वर्णन, नरिष्यन्त चरित्र, इक्ष्वाकु चरित्र, नल चरित्र, श्री रामचन्द्रची उत्तम कथा, कुशच्या वंशाचे वर्णन, सोमवंशाचे वर्णन, पुरुरुवाची पुण्यमयी कथा, राजा नहुषचे अद्भुत वृतांत, ययातिचे पवित्र चरित्र, यदुवंशचे वर्णन, श्रीकृष्णची बाललीला, त्यांची मथुरा द्वारकेतील विविध लीला, सर्व विष्णु दशावतारांच्या कथा, सांख्यमतचे वर्णन, प्रपंचाच्या मिथ्यावादाचे वर्णन, मार्कण्डेयजीचे चरित्र तसेच पुराण श्रवण इत्यादिचे फल, हे सर्व विषय मार्कण्डेय पुराणांत सांगितले गेले आहेत.   

N/A

References : N/A
Last Updated : March 13, 2023

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP