(गीति)
पूर्वी विनायकांनीं, शुक्लगृहीं भोजनास तें केलें ।
सनकसनंदन यांना, दावी साक्षा गणेश बहु झाले ॥१॥
त्यांचा गर्व हरोनी, भक्ती करवी त्वरीत त्यांकरवीं ।
त्यांना प्रसन्न होउन, वर दिधले त्यांकडून हें करवीं ॥२॥
स्थापित मूर्ती तेथें, वरद-गणेशाख्य होय तो प्रथित ।
मूर्तीसंनिध तीर्थां, नाम गणेशाख्य हें असें देत ॥३॥
नंतर भक्ति-प्रिय हें, समजावें त्या म्हणून कीं शमिचें ।
सांगे महात्म्य विधि तो, व्यासांसी तेधवां सुधा वाचें ॥४॥
हें अनुसंधान पुढें, समजावें कीं म्हणून अनुवाद ।
केला पुन्हां मुनी हो, कथिति विधिला पुढील अनुवाद ॥५॥