मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|गणेश पुराण|क्रीडा खंड|पूर्वार्ध|
अध्याय ३८

क्रीडा खंड - अध्याय ३८

श्री गणेश पुराणाचे पारायण केल्याने समाधान मिळते आणि जीवनातील सर्व पापे नष्ट होतात.


(गीति)

कीर्ती म्हणे मुनींना, मम सुत आहे बहूत तो सान ।

वदतां न येचि त्याला, सहज असा मंत्र ये मुखांतून ॥१॥

ऐसा गजाननाचा, मंत्र सुता सांगण्या सती विनवी ।

म्हणती मुनी तियेला, प्रभुचा महिमा असा असे साध्वी ॥२॥

प्रभुचें नाम असें कीं, चतुराक्षरि तें जगास कारण हें ।

त्याच्या कृपेमुळें जें, घडलें आहे कथीन ऐकें हें ॥३॥

प्रभु नामाच्या योगें, रक्षियला धर्म हा दिवोदासें ।

काशीमध्यें मरतां, मुक्ती लाभे शिवास बल ऐसें ॥४॥

जगताचें पालन दे, करण्यासाठीं हरीस सामर्थ्य ।

जगतां निर्माया दे, देव-गजानन विधीस सामर्थ्य ॥५॥

अणखी गजाननाचें, नाम असें ढुंढिराज हे कीर्ती ।

प्राप्त कशास्तव झालें, कथितों कथनास ऐक हें कीर्ती ॥६॥

पूर्वी अगस्ति मुनिंना, कथिलें जें वृत्त कार्तिकेयानें !

कथन करीं मी तुजला, ऐकें साध्वी सुशान्त चित्तानें ॥७॥

पूर्वीं कश्यप मुनिंना, सृष्टी निर्मी म्हणून विष्णूनें ।

आज्ञा दिधली तेव्हां, निर्मियली ती तपोबलें त्यानें ॥८॥

जारज अंडज आणी, स्वेदज तैसा जनीत उद्‌भीज ।

संख्या लक्षचतुर्गुण, वीसाधिक त्यांत एकही समज ॥९॥

दुर्बल दीन नि पंगू, यांच्यासाठीं जनीत तीं तीर्थे ।

सुर-मुनि यांनीं केलीं, प्राण्यांची मुक्ति याच कीं अर्थे ॥१०॥

मुक्तीचें क्षेत्र असे, वाराणशि हें शिवेंच निर्मियलें ।

रक्षी शिवलय-कालीं, त्रिशुलाग्रीं ती धरुन मंत्रबलें ॥११॥

भस्मासुराख्य राक्षस, दूरासद हा तयास पुत्र असे ।

शुक्रापासुन त्यानें, पंचाक्षरि मंत्र घेतला तपसें ॥१२॥

अंगुष्ट-पर्व-भागीं, तिष्ठत राहुन तपास कीं केलें ।

केलें बहूत वर्षें, पाहुन शंकर मुदीतसे झाले ॥१३॥

शंकर-वर-प्रदाना, आले संनिध दुरासदाजवळी ।

त्यानें स्तवून भावें, मागितले वर सदाशिवाजवळी ॥१४॥

चारी खाणींपैकीं, कोणाच्याही कडून मृत्यु नसे ।

तैसेंच देव-दानव, यक्ष तसे राक्षसादि हस्तिं नसे ॥१५॥

एका शक्तीवांचुन, तुजला मृत्यू नसे असा वर हो ।

देऊन गुप्त शिव हो, कथिला इतिहास तीस मुनि कथि हे ॥१६॥

वदती मुनी तियेला, पुढती ऐकें असूर वृत्तास ।

भृगुनें तसेंच कथिलें, दुःखितशा सोमकान्त भूपास ॥१७॥

N/A

References : N/A
Last Updated : October 15, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP