मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|गणेश पुराण|क्रीडा खंड|पूर्वार्ध|
अध्याय ३

क्रीडा खंड - अध्याय ३

श्री गणेश पुराणाचे पारायण केल्याने समाधान मिळते आणि जीवनातील सर्व पापे नष्ट होतात.


(गीति)

द्विजवर मिळतां दोघे, दुसरे दिवशीं विधीस सारुन ।

करिती विचार मग ते, देवांतक नी नरांतक मिळुन ॥१॥

शंकरवर प्रसादें, स्वर्गा जिंकीन मी असें वदला ।

देवांतक बंधूशीं, जिंकी तूं दोन लोक हें वदला ॥२॥

शुभदिन पाहुन दोघे, त्रैलोक्या जिंकण्यास ते सिद्ध ।

झाले एकमतानें, आश्रम त्यजिती त्वरीत तें सिद्ध ॥३॥

वायुपरी देवांतक, गगनीं उड्डाण तो करी सहजीं ।

अमरावतीस आला, नंदनवन नाशिलें बळें चोजीं ॥४॥

नंदनवन नाशियलें, पाहुन हें इंद्रवीर बहु क्रुद्ध ।

देवांतकास लक्षुन, युद्धासाठींच जाहला सिद्ध ॥५॥

इंद्राच्या वीरांचा, देवांतक एकटा करी नाश ।

तैशीच करीं घेई, वज्रांकुश खड्‌ग चापही पाश ॥६॥

नंतर इंद्र चढे मग , ऐरावतिं बैसला करीं आयुधें ।

मारी हांक बलानें, देवांतक वीर सावरी आयुधें ॥७॥

परते त्वरीत युद्धा, देवांतक ऐकुनी अशी हांक ।

देवांतकास वदला, रणरंगीं मत्समीप ये ठाक ॥८॥

देवांतकास भीती, पळती धृति सैनिकासांस दे इंद्र ।

वज्रप्रहार रागें, करिता झाला तया शिरीं इंद्र ॥९॥

देवांतक शीर्षाचा, छेद न होतां पवीच तें भंगे ।

देवांतक इंद्राला, बुक्की मारी पडे झणीं आंगें ॥१०॥

नंतर कसाबसा तो, उठला आणी पळून तो जाई ।

त्याचेमागुन देवहि, पळते झाले त्वरीत त्या समयीं ॥११॥

इंद्रासहीत देवहि, देवांतक ते समस्त कीं अडवी ।

कित्येक चापटीनें, यम-सदनीं धाडिले तसे उरवीं ॥१२॥

स्वबलें देवांतक तो, अनर्थ करि तो जणूं प्रलयकाळ ।

वाटे सुरांस तेव्हां, इंद्र पळे स्थान सोडिलें सरळ ॥१३॥

देवांतक थाटानें, गर्जे बैसे पदींच इंद्राचें ।

ऐकुन असूर आले, स्वर्गी जमले समस्त ते साचे ॥१४॥

दैत्यांनीं देवांतक, स्थापियला अमरपूर राज्यांत ।

मोद तयांना झाला, नंतर सारे विधीपुरा जात ॥१५॥

विधिनें स्थान त्यजियलें, त्या स्थानीं एक भूप नेमियला ।

नंतर समस्त जाती, वैकुंठीं तो हरी बघे सकलां ॥१६॥

मा सह माधव गेला, लपला मग क्षीरसागरीं ऐका ।

स्थापुन भूपति तेथें, देवांतक विजय पावला लोका ॥१७॥

N/A

References : N/A
Last Updated : October 15, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP