मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|गणेश पुराण|क्रीडा खंड|पूर्वार्ध|
अध्याय ४४

क्रीडा खंड - अध्याय ४४

श्री गणेश पुराणाचे पारायण केल्याने समाधान मिळते आणि जीवनातील सर्व पापे नष्ट होतात.


(दिंडी)

मुनी कीर्तीला चरित सांगतात ।

दिवोदासाचें ऐक हें पुनीन ॥

पूर्वि जगती हा श्रेष्ठ असे राजा ।

सोमंवशी तो जनित असे राजा ॥१॥

असे उपकारी द्वेषभाव नाहीं ।

तशी परक्याचे धनीं आस नाहीं ॥

जितेंद्रिय तो असुनि बहू दाता ।

तसा लढवय्या बहुत शूर होता ॥२॥

तपोबल हें त्यास पूर्ण होतें ।

म्हणुन विधि कीं तुष्ट बहू होते ॥

विधी काशीचें राज्य तया देई ।

करी राज्यातें भूप अशा ठायीं ॥३॥

बहुत वरुषें काशीस नसे झालीं ।

मेघवृष्टी ती म्हणुन प्रजा गेली ॥

दिवोदासानें पुण्य बहू केलें ।

म्हणुन वर्षावीं विपुल नीर झालें ॥४॥

असें पाहूनियां परत लोक येती ।

अतां कथितों हे भूपपत्‍नी मी ती ॥

नाम सुशिला हें योग्य तीस होतें ।

तसे साध्वीचे पूर्ण गूण होते ॥५॥

(गीति)

आणून पंडितरायें, वर्तन करण्यास उचित ते नियम ।

करवी तयांकडूनी, वर्तन-व्यवहार शुद्धता नियम ॥६॥

वागे प्रजा तयाची, न्यायानें म्हणुन त्या नसे दंड ।

अपमृत्यूही नाहीं, दुःख तसा शोकही न हो दंड ॥७॥

यज्ञादि सर्व कर्मे, चालू झालीं पुन्हां तिथें कीर्ती ।

देव प्रसन्न होती, यास्तव शांती सदैव हो कीर्ती ॥८॥

तो देवांना स्तवि मग, देव तसे वानिती दिवोदास ।

ऐसें चरित्र त्याचें, कथिता झाला मुनी तया सतिस ॥९॥

N/A

References : N/A
Last Updated : October 15, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP