मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|गणेश पुराण|क्रीडा खंड|पूर्वार्ध|
अध्याय ११

क्रीडा खंड - अध्याय ११

श्री गणेश पुराणाचे पारायण केल्याने समाधान मिळते आणि जीवनातील सर्व पापे नष्ट होतात.


(गीति)

इंद्रानें त्या बटुचें, पूजन केलें नसेच हें कळलें ।

यास्तव कश्यप वदले, ऐका मुनि हो रहस्य त्या कथिलें ॥१॥

परमात्मा निर्गुण हा, सगूण रुपा धरुन मम सदनीं ।

घेई अवतार बटू, असुरांचा नाश भाव हा धरुनी ॥२॥

बटुशीं विरोध करि जो, तो पावे नाश खास हें वदले ।

गर्विष्ठ इंद्र ऐकुनि, विरोध करि तें कशापरी केलें ॥३॥

बटुला निराळ पंथें, उडवी ऐसें वदे समीरास ।

त्याच्या पराक्रमानें, भव्य असे वृक्ष पडति भूमीस ॥४॥

तैसे गिरिवर हलती, त्रिजगीं जीवास वाटते भीती ।

प्रलय अकालीं होतो, भास असा वाटला म्हणुन भीती ॥५॥

इतुकें झालें तरिही, बटु होता त्या स्थळींच तो स्थीर ।

शक्ती कुंठित झाली, वायूची पाहुनी मनीं स्थीर ॥६॥

आज्ञा वन्हिस दिधली, जाळी बटुला त्वरीत ये स्थानीं ।

भडके कृशान तेव्हां, उदधी गेले समस्त आटोनी ॥७॥

झाला जिकडे तिकडे, प्रलयानें तो समग्र कल्लोळ ।

देखुन प्रकार सारा, अग्नी गिळि तो समस्त बटु बाळ ॥८॥

(दिंडी)

इंद्र कोपानें पाहि त्या बटूला ।

नेत्र उघडी तो सर्व त्या क्षणाला ।

असें पाहुनियां अदितिसूत-रुप ।

प्रकट करि तें देखतसे रुप ॥९॥

नयन मस्तक नी हस्त-पाद-कर्ण ।

अमित दिसती त्या बटुस सर्व पूर्ण ।

नयनिं तिष्ठति ते चंद्र सूर्य दोनी ।

अमित विश्वें हीं पाहिलीं सर्व त्यांनीं ॥१०॥

विश्वरुपी हा सूत कश्यपाचा ।

इंद्र देखोनी गर्व रहित साचा ।

असा झाला हें पाहतीच लोक ।

तया देखत त्या पूजितसे ऐक ॥११॥

अर्पि अंकुश तो इंद्र सुरानंदा ।

कल्पवृक्षहि दीधले मुनीवृंदां ।

सूत सांगति हें वृत्त मधुर वाचे ।

इंद्र ठेवित हें नाम त्या बटूचें ॥१२॥

’विनायक’ हें नाम इंद्र देत ।

देव गर्जति तें मुदित बहू होत ।

इंद्र झाला कीं अभयवरें यूत ।

विश्वरुपाचें स्तोत्र तो करीत ॥१३॥

इंद्रविरचित हा स्तोत्र पाठ नित्य ।

तीन वेळां जो करित पाठ सत्य ।

विजयि होइल तो अदितिसूत देई ।

अशिर्वचनातें देत तया ठायीं ॥१४॥

N/A

References : N/A
Last Updated : October 15, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP