मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|गणेश पुराण|क्रीडा खंड|पूर्वार्ध|
अध्याय २

क्रीडा खंड - अध्याय २

श्री गणेश पुराणाचे पारायण केल्याने समाधान मिळते आणि जीवनातील सर्व पापे नष्ट होतात.


(दिंडी)

रौद्रकेतूला पुसति उभय सूत ।

तपासाठी कीं जाउं अरण्यांत ।

जनक आज्ञापी उभय सुतां तूर्ण ।

तपा करणें एकाग्रमनें पूर्ण ॥१॥

तयां आज्ञा ही जनक तदा देई ।

उभे तिष्ठति अंगुष्ठपर्व दोई ।

जपति पंचाक्षरि मंत्र मनोभावें ।

तयां देखुनियां शंभु तयां पावे ॥२॥

प्रकट झाले तेधवां उमानाथ ।

वरा मागा मी पुरविं मनोरथ ।

असें वदतां ते शंभु तया सूतां ।

वरा मागति ते श्रवण करा आतां ॥३॥

(गीति)

आम्हां मरण नसावें, सुरमानवदानवादि यक्षमुनी ।

गंधर्व इंद्र सर्पां, आदिकरुन जनितशा बहू पाणीं ॥४॥

दिवसा किंवा रात्रीं, शस्त्रानें वा तसेंच अस्त्रानें ।

आम्हां मरण नसावें, त्रिजगिं राज्या करुं सु-वरदानें ॥५॥

अपुले ठायीं सांबा, भक्ति जडावी अम्हांस ही आस ।

ऐकुन भाषण त्यांचें, शिरसीं ठेवी वरास्तव करास ॥६॥

शिवमुखिं तथास्तु वदले, अंतर्धानास ते तिथें गेले ।

तप हें समाप्त केलें, दोघे परतून ते गृहीं आले ॥७॥

(पृथ्वी)

पित्यास नमिलें अधीं कथियलें घडे वृत्त तें ।

मुदीत बहु जाहले श्रवुन मानसीं वृत्त तें ।

सुतांस मग घातलें स्नपन तें उटीं लावुनी ।

करीत मग सांगता यशदशा तपा पावनीं ॥८॥

करीत द्विजभोजना बहुत आदरें रौद्र कीं ।

मुदीत द्विज जाहले वरदवाणि कीं लौकिकीं ।

वदोन सदनास ते परत जाति हो ब्राह्मण ।

करी श्रवण भूपती कथितसे भृगू ब्राह्मण ॥९॥

N/A

References : N/A
Last Updated : October 15, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP