मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|गणेश पुराण|क्रीडा खंड|पूर्वार्ध|
अध्याय ५३

क्रीडा खंड - अध्याय ५३

श्री गणेश पुराणाचे पारायण केल्याने समाधान मिळते आणि जीवनातील सर्व पापे नष्ट होतात.


(पृथ्वी)

मुनीस कथिती विधी बहुत पुण्य ज्याचें असे ।

तयास मिळतें बरें उदक इक्षुधीचें असें ।

करी नृपति सेवुनी स्वकिय ती पिपासा पुरी ।

बघे उदधि एक ती कमलिनी सु-पुष्पें बरी ॥१॥

सहस्त्र-दल-युक्तशी कमलिनी दिसे राजस ।

सहस्त्र-किरणाख्य हें कमल नाम तें राजसा ।

दिसे कमल त्यामधें शयनशेज ती सुंदर ।

सभोंवतिं सुवास तो बहुत धूप देती वर ॥२॥

समीप कुसुमें सुवासिक अशीं तिथें सुंदर ।

बहूत शशितेजसा पहुडला प्रभू ईश्वर ।

नृपा दुरुन दाविती गण तदा बघे शांतसा ।

करी धरुन नेति ते जवळ कीं प्रभू राजसा ॥३॥

प्रभू उठति तोंवरी जवळ ते उभे राहिले ।

प्रभू उठति दूत ते म्हणति भक्त हे आणिले ।

गजानन तदा म्हणे नृपतिला बसा आसनीं ।

बसोन मग भूपती बघतसे प्रभू चक्षुंनीं ॥४॥

(वसंततिलका)

तों भूपतीस नयनीं फुटती मुदासूं ।

आला असें गहिंवरें वदनीं रवासूं ।

येईन हें बघतसे प्रभुभक्त राणा ।

झाली तशीच प्रभुची मति तीच जाणा ॥५॥

आलिंगिती मग परस्पर एकमेकां ।

भेटे पित्यास सुत त्या परि व्यास ऐका ।

दोघे स्वतां क्षणभरी विसरोन जाती ।

देवास भक्त रुचती प्रियपात्र होती ॥६॥

राजा स्तवी गणपती दश-पद्य यांनीं ।

ऐके स्तुती गणपती बहु हर्ष मानी ।

राजास तो म्हणतसे वर माग आतां ।

राजा वदे मज करीं कृतकृत्य ताता ॥७॥

द्यावा मशीं वर विभू जगतांत जन्म ।

मृत्यू तसाच नसणें मजसी अजन्म ।

सांगे विधी कथन हें प्रिय मित्र तात ।

सांगे भृगू कथन हें श्रवि सोमकांत ॥८॥

N/A

References : N/A
Last Updated : October 15, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP