मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|गणेश पुराण|क्रीडा खंड|पूर्वार्ध|
अध्याय ५५

क्रीडा खंड - अध्याय ५५

श्री गणेश पुराणाचे पारायण केल्याने समाधान मिळते आणि जीवनातील सर्व पापे नष्ट होतात.


(गीति)

शुक्ल ब्राह्मणसदनीं, जाऊन स्वगृहीं विनायका राजा ।

शिबिकेमाजी बसवुन, सुस्वर गजरें अणीत बहु ओजा ॥१॥

स्वारी विनायकाची, बहु थाटानें निघे तया पुसुनी ।

शुक्ल ब्राह्मण प्रभुला, पत्‍नीसह बोळवी वळे सदनीं ॥२॥

पूर्वींची पर्णकुटी, जाउन तेथें सुवर्णमय भुवन ।

दिसले द्वयास अणखी, ऐके व्यासा विधी कथी कथन ॥३॥

तेथें बहूत दासी, दासादिक गुंग जाहलीं कामीं ।

दिसलीं सतीस तेव्हां, भ्रमली तेथें बघे पती धामीं ॥४॥

शुक्ल वदे त्या सतिला, आहे प्रभुचा प्रसाद हा खास ।

ऐशा सांगून गोष्टी, निरसी भ्रम शुक्ल तेधवां तीस ॥५॥

प्रभुची शिबिका चाले, काशीराजासमीप शिबिकेच्या ।

ऐशी संधी साधुन, दैत्य नरांतक वधार्थ दोघांच्या ॥६॥

पाठवि असूर दोघे, शूर तसा चपल हा महाद्वाड ।

वधिले असूर म्हणुनी, त्यांचा घ्यावा अतां तरी सूड ॥७॥

ऐसें जाणुन देवें, त्यजिली शिबिका त्वरीत त्या समयीं ।

धरिले असूर दोघे, गरगर फिरवी दया तया येयी ॥८॥

देवें असूर त्यजिले, काशीराजा पुसे बहु प्रेमें ।

मोठे अन्यायी हे, असुन कसे सोडिले जिवें प्रेमें ॥९॥

मजला वाटे देवा, प्राण्यांचें दुःख वा नसे सौख्य ।

किंवा तसाच मृत्यू, जन्म यया वासना तुझी मुख्य ॥१०॥

मजला आतां कळलें, उरली नाहीं खरोखरी शंका ।

काशीराजा वदला, विनायकासी सुभक्तिनें श्रविकां ॥११॥

N/A

References : N/A
Last Updated : October 15, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP