|
अ.क्रि. १ पाण्यात न बुडता केवळ पृष्ठभागावर राहणे ; तरणे ; तिरणे ; पोहणे . तरंगावो लागे बुद्धी । विवेकावरी । - ज्ञा १४ . २२२ . २ ( ल . ) बहकणे ; ( बोलताना ) वहावत जाणे ; मुद्दा सोडून भलतेच बोलणे . ३ ( एखादा खटला , वाद इ० ) निकाल न लागता भिजत , लोंबकळत , कुचंबत पडणे . ४ ( मन इ० ) संशयांत , संदिग्ध स्थितीत असणे . ५ भांबावणे ; कुंठित होणे ; थांबणे ; थबकणे . ६ ( एखाद्या व्यक्तीची , गोष्टीची ) अपेक्षा धरुन खोळंबून राहणे ; तिष्ठत बसणे ; मार्गप्रतीक्षा करीत थांबणे . ज्याप्रमाणे वषट्कराचा घोष चालून इंद्रादि देवता सोमपानाविषयी तरंगल्या असतां ... - नि ४१६ . तुमच्यासाठी ही सर्व मंडळी तरंगली . [ तरंग ] ०तरंगायास - ( एखादे काम इ० ) निकालांत न काढता लोंबकळत ठेवणे ; संदिग्ध स्थितीत पडणे . तरंगविणे - सक्रि . १ ताटकळत , खोळंबून ठेवणे . २ ( कार्य इ० ) लोंबकळत , भिजत ठेवणे . [ तरंगणे ] लावणे - ( एखादे काम इ० ) निकालांत न काढता लोंबकळत ठेवणे ; संदिग्ध स्थितीत पडणे . तरंगविणे - सक्रि . १ ताटकळत , खोळंबून ठेवणे . २ ( कार्य इ० ) लोंबकळत , भिजत ठेवणे . [ तरंगणे ]
|