Dictionaries | References

तरणे

   
Script: Devanagari

तरणे

 क्रि.  तरंगणे , पोहणे ;
 क्रि.  निभावून जाणे , पार पडणे , मुक्त होणे , सुटणे .

तरणे

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 verb  बुडता राहणे   Ex. रामनामाच्या प्रभावाने पाषाणही समुद्रात तरले.
ONTOLOGY:
कर्मसूचक क्रिया (Verb of Action)क्रिया (Verb)
 verb  संसाराच्या बंधनातून सुटका होणे   Ex. भगवंताच्या नामस्मरणानेच तू तरशील.
HYPERNYMY:
ONTOLOGY:
होना क्रिया (Verb of Occur)क्रिया (Verb)
   see : पोहणे

तरणे

 अ.क्रि.  १ ( पाण्यावर ) तरंगणे ; पोहणे . २ - उक्रि . नदीपार जाणे ; पैलतीर गांठणे . कां बाही तरतां वळसा । दाटला जेवी । - ज्ञा १३ . १८६ . ३ ( ल . ) संकट , प्रपंच इ० कांतून निभावून जाणे ; सुखरुप पार पडणे ; मुक्त होणे . हाणी गुरु शर कठिनहि माझे त्या सुकठिना न वक्ष तरे । - मोउद्योग १३ . १३५ . ४ मोक्ष मिळणे ; संसारसागर पार होणे ; ईश्वरप्राप्ति होणे . [ सं . तरण ] तरणोपाय - पु . १ संकटांतून निभावून जाण्याचा उपाय ; इलाज ; बचाव . २ धडगत ; गत्यंतर ; सद्गति . [ सं . तरण + उपाय ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP