Dictionaries | References

दुर

   
Script: Devanagari

दुर     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
ind   A depreciative particle and prefix employing inferiority, badness, grievousness, difficulty &c.

दुर     

अ.  दुष्टपणा ; वाईटपणा , कठिणपणा , दुःख इ०कांच्या वाचक शब्दापूर्वी योजावयाचा उपसर्ग . जसेः - दुराचार = वाईट वर्तणूक ; दुर्लभ = मिळण्यास कठिण ; दुस्सह = सहन करण्यास कठिण इ० . याची संधिनियमानुरुप दुर , दुस , दुष , दुश इ० रुपे होतात . जसेः - दुर्लभ दुष्कर , दुश्चल , दुस्सह , दुस्साध्य , दुराचार , दुरंत इ . हा उपसर्ग जोडून अनेक सामासिक शब्द बनतात . त्यांपैकी कांही येथे दिले आहेत . दुरंत - वि . १ अपार ; अनंत ; अमर्याद ; अंत लागण्यास कठिण असा ( मोह , माया इ० ). २ अतिशय कठिण ; तीव्र ( दुःख इ० ). [ दुर + अंत = शेवट ] दुरतिक्रम - वि . १ ओलांडून जाण्यास कठिण ; दुस्तर ; दुर्लघ्य . २ असाध्य . [ दुर + अतिक्रम = ओलांडणे ] दुरत्यय - यी - वि . १ नाश करुन टाकण्यास कठिण . २ प्रतिबंध करण्यास , टाळण्यास कठिण ; अपरिहार्य . ३ असाध्य ( दुःख , आजार , रोग इ० ). अप्रतीकार्य ( अडचण , संकट ). ४ मन वळविण्यास कठिण असा ( मनुष्य ); दुराराध्य . [ दुर + अत्यय = पार पडणे , जाणे इ० ] दुरदृष्ट - न . दुर्दैव ; वाईट अदृष्ट की आड आले दुरदृष्ट माझे । - सारुह १ . १० . [ दुर + अदृष्ट ] दुरधिगम्य - वि . १ समजण्यास कठिण ; दुर्बोध ; दुर्ज्ञेय . २ दुष्प्राप्य ; मिळण्यास कठिण ; दुर्गम . [ दुर + सं . अधि + गम = मिळविणे ] दुरभिमान - पु . पोकळ , वृथा , अवास्तव अभिमान ; फाजील गर्व . [ दुर + अभिमान ] दूरवबोध - वि . दुर्बोध ; गूढ . [ दुर + सं . अव + बुध = जाणणे ] दुराकांक्षा - स्त्री . दुष्प्राप्य वस्तूचा अभिलाष . [ दुर + आकांक्षा = इच्छा , अभिलाष ] दुराग्रह - पु . हट्ट , लोकविरोध , शास्त्रविरोध , संकटे इ० कांना न जुमानतां एखाद्या गोष्टीचा पिच्छा पुरविण्याचा हट्ट ; अनिष्ट आग्रह . न सुखद दुराग्रह सखा हा सर्वाऽनर्थ गेह ठक राया । - मोकर्ण ४६ . ५० . [ दुर = वाईट + आग्रह = हट्ट ] दुराग्रही - वि . दुराग्रह धरण्याचा ज्याचा स्वभाव आहे असा ; हेकेखोर ; हटवादी ; हट्टी . [ दुराग्रह ] दुराचरण , दुराचार - नपु . निंद्य , वाईट , वागणूक ; दुर्वर्तन ; दुष्ट आचरण . [ दुर = दुष्ट + सं . आचरण = वर्तन ] दुराचरणी , दुराचारी - वि . निंद्य , वाईट , दुष्ट वर्तनाचा ; बदफैली . [ दुराचार ] दुरात्मत्व - न . १ दुष्ट अंतकरण ; मनाचा दुष्टपणा . २ दुष्ट कृत्य . किमपि दुरात्मत्व घडले । [ दुर = दुष्ट + आत्मा = मन ] दुरात्मा - वि . दुष्ट मनाचा ( मनुष्य ); खट ; शठ . [ दुर + आत्मा ] दुराधर्ष - वि . जिंकण्यास , वर्चस्वाखाली आणण्यास कठिण . [ दुर + सं . आ + धृष = जिंकणे ] दुराप - वि . मिळविण्यास कठिण ; दुर्लभ ; अप्राप्य . राया , भीष्माला जे सुख , इतरां ते दुराप , गा , स्वापे । - मोभीष्म ६ . २९ . दुरापस्त , दुरापास्त - वि . घडून येण्यास कठिण ; दुर्घट ; असंभ्याव्य . वाळूचे तेल काढणे ही गोष्ट दुरापस्त आहे . [ दुर + सं . अप + अस = ] दुराराध्य - वि . संतुष्ट , प्रसन्न करण्यास कठिण , अशक्य ; मन वळविण्यास कठिण . मोक्षु दुराराध्य कीर होय । परि तोही आराधी तुझे पाय । - ज्ञा ११ . ९९ . [ दुर + सं . आराध्य ] दुराशा - स्त्री . निरर्थक , फोल , अवास्तव आशा ; दुष्प्राप्य गोष्टीची आशा दुष्ट वासना . आम्हास अन्न खावयास मिळेना आणि पालखीत बसण्याची दुराशा धरावी हे चांगले नव्हे . दुराशागुणे जो नव्हे दैन्यवाणी । - राम १६८ . [ दर + आशा ] दुरासद - वि . कष्टाने प्राप्त होणारे ; जिंकण्यास , मिळण्यास कठिण . [ दुर + सं . आ + सद = मिळविणे ] दुरित - न . पाप ; पातक ; संचितकर्म . पुन्हां न मन हे मळो दुरित आत्मबोधे जळो । - केका ११९ . [ दुर + सं . इ = जाणे ] दुरुक्त - न . वाईट , दुष्टपणाचे , अश्लील भाषण . [ दुर + सं . उक्त = बोललेले ; भाषण ] दुरुक्ति - स्त्री . वाईट भाषण ; शिवी ; अपशब्द ; दुर्भाषण ; अश्लील बोलणे . [ दुर + उक्ति = बोलणे ] दुरुत्तर - न . अपमानकारक , उर्मटपणाचे उत्तर ; दुरुक्ति . [ दर + उत्तर ] दुरुद्धर - वि . खंडण करण्यास , खोडून काढण्यास कठिण असा ( पूर्वपक्ष , आक्षेप , आरोप ). या सिद्धांतावर दोष दिला हा सर्वांस दुरुद्धर आहे . [ दुर + सं . ऊह = अनुमानणे ] दुर्गत - वि . गरीब ; दीन ; दरिद्री ; लाचार . झांकी शरपटलानी आढ्य जसा दुर्गतांसि वस्त्रांनी । - मोभीष्म ९ . ६५ . [ दुर + सं . गत = गेलेला ] दुर्गति - स्त्री . १ दुर्दशा ; वाईट स्थिति ; संकटाची , लाजिरवाणी स्थिति ; अडचण ; लचांड . २ नरक ; नरकांत पडणे . [ दुर + गति = स्थिति ] दुर्गंध - गंधी - पुस्त्री . घाण ; वाईट वास . - वि . घाण वास येणारे [ दुर = वाईट + सं . गंध = वास ]
०नाशक वि.  ( रसा . ) दुर्गंधाचा नाश करणारे ; ( इं . ) डिओडरंट . [ दुर्गंध + सं . नाशक = नाश करणारा ] दुर्गंधिल वि . ( रासा . ) आर्सेनिक व मेथिल यांच्या संयोगापासून बनलेला विषारी , दुर्गंधी ( पदार्थ ) ( इं . ) कॅकोडिल . दुर्गम वि . जाण्यास कठिण ( स्थळ , प्रदेश इ० ). [ दुर + सं . गम = जाणे ] दुर्गुण पु . वाईट गुण ; दोष ; अवगुण ; दुर्मार्गाकडील कल . ( क्रि० आचरणे ). [ दुर + गुण ] दुर्गुणी वि . वाईट गुणांचा ; अवगुणी ; दुराचरी ; दुर्वर्तनी . [ दुर्गुण ] दुर्घट वि . घडवून आणण्यास , घडून येण्यास , सिद्धीस नेण्यास कठिण . [ दुर + सं . घट = घडणे , घडवून आणणे ] दुर्घटना स्त्री . अशुभ , अनिष्ट गोष्ट घडणे ; आकस्मित आलेले संकट , वाईट परिस्थिति . [ दुर + सं . घटना = स्थिति ] दुर्घाण स्त्री . दुस्सह घाण ; ओरढाण ; उग्रष्टाण . [ दुर + घाण ] दुर्जन पु . वाईट , दुष्ट मनुष्य . [ दुर + जन = मनुष्य , लोक ] दुर्जय वि . १ जिंकण्यास कठिण . २ दुस्साध्य ; दुस्तर . [ दुर + सं . जि = जिंकणे ] दुर्जर वि . पचविण्यास , विरघळण्यास कठिण . [ दुर + सं . जृ = जिरणे ] दुर्दम वि . दमन करण्यास , वर्चस्वाखाली आणण्यास कठिण . तिला इंग्लंडांतील प्रबल व दुर्दभ प्रजाजनांच्या अडथळ्याशिवाय दुसरे कोणतेच नियमन नसे . - पार्ल ६ . [ दुर + दम ] दुर्दर्श वि . दिसण्यास , पाहण्यास कठिण ; अतिशय अस्पष्ट . [ दुर + सं . दृश = पाहणे ] दुर्दशा स्त्री . अवनतीची , अडचणीची , संकटाची , वाईट , दुःखद स्थिति ; दुर्गति ; दुःस्थिति . भिजल्यामुळे शालजोडीची दुर्दशा जाली . [ दूर + दशा = स्थिति ] दुर्दिन न . १ वाईट दिवस . २ अकाली अभ्रे आलेला दिवस . ३ वृष्टि . - शर . [ दर + सं . दिन = दिवस ] दुर्दैव न . कमनशीब ; दुर्भाग्य . की माझे दुर्दैव प्रभुच्या मार्गात आडवे पडले . - मोसंशयरत्नमाला ( नवनीत पृ . ३४९ ). - वि . कमनशिबी ; अभागी . [ दुर + दैव = नशीब ] दुर्दैवी वि . अभागी ; कमनशिबी . [ दुर्दैव ] दुर्धर पु . एक नरकविशेष . [ सं . ] दुर्धर वि . १ धारण ; ग्रहण करण्यास कठिण . २ दुस्साध्य ; दुष्राप्य . ३ ( काव्य ) ( व्यापक ) बिकट ; खडतर ; असह्य ; उग्र ; कठिण . तप करीत दुर्धर । अगी चालला धर्मपूर । ४ भयंकर ; घोर ; भयानक . महादुर्धर कानन । [ दुर + सं . धृ = धरणे , धारण करणे ] दुर्धर्ष वि . दुराधर्ष ; दमन करण्यास , वर्चस्वाखाली आणण्यास कठिण ; दुर्दम्य ; अनिवार्य . [ दुर + धृष = जिंकणे , वठणीवर आणणे ] दुर्नाम न . अपकीर्ति ; दुष्कीर्ति ; बदनामी . [ दुर + सं . नामन = नांव ] दुर्निमित्त न . अन्याय्य , निराधार कारण , सबब , निमित्त . [ दुर + निमित्त = कारण ] दुर्निर्वह वि . १ दुःसह ; असह्य ; सहन करण्यास कठिण ; निभावून जाण्यास , पार पाडण्यास कठिण ( अडचण , संकट ). २ दुस्साध्य ; दुष्कर ; [ दुर + सं . निर + वह ] दुर्निवार , दुर्निवारण वि . १ निवारण , प्रतिबंध करण्यास कठिण ; अपरिहार्य ; अनिवार्य . २ कबजांत आणण्यास कठिण ; दुर्दम्य . [ दुर + नि + वृ ] दुर्बल वि . १ दुबळा ; अशक्त ; असमर्थ . २ गरीब ; दीन ; दरिद्री . ऐसे असतां एके दिवशी । दुर्बळ द्विज आला परियेसी । - गुच ३८ . ७ . [ दुर + बल = शक्ति ] दुर्बळी वि . ( काव्य . ) दुर्बळ पहा . दुर्बुद्ध वि . १ दुष्ट बुद्धीचा ; खुनशी वृत्तीचा . २ मूर्ख ; मूढ ; मंदमति ; ठोंब्या . [ दुर + बुद्धि ] दुर्बुद्धि स्त्री . १ दुष्ट मनोवृत्ति ; खुनशी स्वभाव ; मनाचा दुष्टपणा . दुर्बुद्धि ते मना । कदा नुपजो नारायणा । - तुगा ७९८ . २ मूर्खपणा ; अनिष्ट परिणामकारक बुद्धि . - वि . दुष्ट मनाचा ; दुर्बुद्ध पहा . [ दुर + बुद्धि ] दुर्बोध वि . समजण्यास कठिण ( प्रंथ , भाषण इ० ). [ दुर + बोध = समजणे , ज्ञान ] दुर्भग वि . कमनशिबी ; दुर्दैवी ; भाग्यहीन . [ दुर + सं . भग = भाग्य ] दुर्भर वि . भरुन पूर्ण करण्यांस कठिण ; तृप्त करण्यास कठिण ( पोट , इच्छा , आकांक्षा ). इंद्रिये वज्रघाते तपे उष्ण वरी ज्वाळ । सोसिले काय करुं दुर्भर हे चांडाळ । - तुगा ३५४ . - न . ( ल . ) पोट . तरा दुस्तरा त्या परासागराते । सरा वीसरा त्या भरा दुर्भराते । - राम ८० . [ दुर + सं . भृ = भरणे ] दुर्भक्ष्य वि . खाण्यास कठिण , अयोग्य ; अभक्ष्य . [ दुर + सं . भक्ष्य = खाद्य ] दुर्भाग्य न . कमनशीब ; दुर्दैव . - वि . दुर्दैवी ; अभागी . [ दुर + सं . भाग्य = दैव ] दुर्भाव पु . १ दुष्ट भावना ; कुभाव ; द्वेषबुद्धि . २ ( एखाद्याविषयीची ) संशय ; वाईट ग्रह ; ( विरु . ) दूष्टभाव . [ दूर + भाव = भावना , इच्छा ] दुर्भाषण न . वाईट , अपशब्दयुक्त , शिवीगाळीचे बोलणे ; दुर्वचन पहा . [ दुर + भाषण = बोलणे ] दुर्भिक्ष न . १ दुष्काळ ; महागाई . २ ( दुष्काळ इ० कांत होणारी अन्नसामुग्री इ० कांची ) टंचाई ; कमीपणा ; उणीव . [ सं . ]
०रक्षित वि.  दासांतील एक प्रकार ; आपले दास्य करावे एतदर्थ दुष्काळांतून वांचविलेला ( दास , गुलाम इ० ). - मिताक्षरा - व्यवहारमयूख दाय २८९ . [ दुर्भिक्ष + सं . रक्षित = रक्षण केलेला ] दुर्भेद वि . बुद्धीचा प्रवेश होण्यास कठिण ; दुर्बोध . तैसे दुर्भेद जे अभिप्राय । कां गुरुगम्य हन ठाय । - ज्ञा ६ . ४५९ . [ दुर + सं . भिद = तोडणे ] दुर्भेद्य वि . फोडण्यास , तुकडे करण्यास कठिण ( हिरा ; तट ). [ दुर + सं . भेद्य = फोडण्यासारखा ] दुर्मति स्त्री . १ दुर्बुद्धि ; खाष्टपणा ; कुटिलपणा . २ मूर्खपणा ; खूळ ; वेडेपणा . - पु . एका संवत्सराचे नांव . - वि . १ दुष्ट बुद्धीचा ; खाष्ट स्वभावाचा . २ मूर्ख ; खुळा ; वेडा . [ दुर + मति = बुद्धि , मन ] दुर्मद पु . दुराग्रहीपणा ; हेकेखोरी ; गर्विष्ठपणाचा हटवादीपणा . किती सेवाल धन दुर्मदा अमृतपदे ५८ . - वि . मदांध ; मदोन्मत्त ; गर्विष्ट . सावियाचि उतत होते दायाद । आणि बळिये जगी दुर्मद । - ज्ञा ११ . ४८० . [ दुर + मद = गर्व ] दुर्मनस्क , दुर्मना वि . खिन्न ; उदास मनाचा ; विमनस्क ; दुःखित . [ दुर + सं . मनस = मन ] दुर्मरण न . ( वाघाने खाऊन , पाण्यांत बुडून , सर्प डसून इ० प्रकारांनी आलेला ) अपमृत्यु ; अपघाताने आलेले मरण ; अमोक्षदायक मरण . [ दुर + मरण ] दुर्मिल , दुर्मील , दुर्मिळ , दुर्मीळ वि . मिळण्यास कठिण ; दुर्लभ . [ दूर + सं . मिल = मिळणे ] दुर्मुख पु . एका संवत्सराचे नांव . - वि . १ घुम्या ; कुरठा ; तुसडा ; आंबट तोंडाचा . २ तोंडाळ ; शिवराळ ; शिनाळ जिभेचा . दुर्मुखी स्त्रीचा त्याग करुन । संन्यास ग्रहण करावा । [ दुर + मुख ] दुर्मुखणे अक्रि . तोंड आंबट होणे ; फुरंगुटणे ; गाल फुगविणे ; ( एखाद्या कार्याविषयी ) उत्साहशून्यतेची चर्या धारण करणे . खायास म्हटले म्हणजे हांसत येतात आणि उद्योगाचे नांव घेतले म्हणजे लागलेच दुर्मुखतात . [ दुर्मुख ] दुर्मुखला वि . आंबट चेहर्‍याचा ; घुम्या ; कुरठा ; तुसडा . [ दुर्मुख ] दुर्मेधा वि . १ मंदबुद्धीचा . २ दुष्ट स्वभावाचा ; दुर्मति . [ दुर + सं . मेधा = बुद्धि ] दुर्योग पु . सत्तावीस योगांतील अशुभ , अनिष्ट योगांपैकी प्रत्येक . [ दुर + योग ] दुर्लघ्य वि . १ ओलांडता येण्यास कठिण ; दुस्तर ( नदी इ० ). २ मोडता न येण्यासारखी , अनुल्लंघनीय ( आज्ञा , हुकूम , शपथ इ० ). ३ निभावून जाण्यास कठिण ( काळ , वेळ इ० ). [ दुर + सं . लघ्य = ओलांडावयाजोगे ] दुर्लभ वि . मिळण्यास कठिण ; अलभ्य ; दुर्मिळ ; दुष्प्राप्य ; विरळा . अलीकडे आपले दर्शन दुर्लभ जाले . दुर्ललित न . चेष्टा ; खोडी . आमच्या विविध दुर्ललिताबद्दल गुरुजींनी कसे शासन केले ... - आश्रमहारिणी ७ . [ दुर + सं . ललित = वर्तन , चेष्टा ] दुर्लक्ष न . लक्ष नसणे ; हयगय ; निष्काळजीपणा ; गफलत ; अनवधान . - वि . १ लक्ष न देणारा ; अनवधानी ; गाफील ; बेसावध . तुम्ही गोष्ट सांगीतली पण मी दुर्लक्ष होतो म्हणून ऐकिली नाही . २ दिसण्यास , समजण्यास कठिण ; ईश्वराचे निर्गुण स्वरुप दुर्लक्ष आहे . [ दुर + सं . लक्ष्य ] दुर्लक्षण न . १ ( मनुष्य , जनावर इ० कांचे ) अशुभसूचक लक्षण , चिन्ह ; दुश्चिन्ह ; दोष ; वाईट सवय ; खोड ; दुर्गुण . हा घोडा लात मारतो एवढे यामध्ये दुर्लक्षण आहे . [ दुर + लक्षण = चिन्ह ] दुर्लक्षण णी वि . १ दुर्लक्षणाने , वैगुण्याने युक्त ( मनुष्य , घोडा इ० ). ( विरु . ) दुर्लक्षणी . २ दुर्गुणी ; दुराचारी ; दुर्वर्तनी . दुर्लक्ष्य वि . १ बुद्धीने , दृष्टीने अज्ञेय ; अगम्य . २ दुर्लक्ष्य इतर अर्थी पहा . [ दुर + सं . लक्ष्य ] दुर्लौकिक पु . अपकीर्ति ; दुष्कीर्ति ; बेअब्रू ; बदनामी ; कुप्रसिद्धि . [ दुर + लौकिक = कीर्ति ] दुर्वच , दुर्वचन , दुर्वाक्य न . १ वाईट बोलणे ; दुर्भाषण ; अशिष्टपणाचे , अश्लील , शिवीगाळीचे भाषण . २ अशुभ , अनिष्टसूचक भाषण . [ सं . दुर + वचस , वचन , वाक्य = बोलणे ] दुर्वह वि . १ वाहण्यास , नेण्यास कठिण . २ सोसण्यास , सहन करण्यास कठिण . - शर . प्रतिकूल . प दुर + वह ] दुर्वात उलट दिशेचा वारा . तुज महामृत्यूचिया सागरी । आता हे त्रैलोक्यजीविताची तरी । शोकदुर्वातलहरी । आंदोळत असे । - ज्ञा ११ . ३४८ . [ दुर + सं . वात = वारा ] दुर्वाद पु . वाईट शब्द ; दुर्वच ; वाईट बोलणे ; भाषण . हां गा राजसूययागाचिया सभासदी । देखता त्रिभुवनाची मांदी । कैसा शतधा दुर्वादी । निस्तेजिलासी । - ज्ञा ११ . १०१ . [ दुर + वाद = बोलणे ] दुर्वार वि . दुर्निवार ; अनिवार्य ; टाळण्यास , प्रतिकार करण्यास कठिण ; अपरिहार्य . २ आवरतां येण्यास कठिण ; अनिवार ; अनावर . [ दुर + वारणे ] दुर्वास सासुरवास ; कष्ट ; त्रास ; जाच . [ दुर + वास = राहणे ] दुर्वासना स्त्री . वाईट इच्छा ; कुवासना ; दुष्प्रवृत्ति . [ दुर + वासना ] दुर्विदग्ध वि . विद्येत न मुरलेला तथापि विद्येचा गर्व वाहणारा ; अर्ध्या हळकुंडाने पिवळा झालेला . [ दुर + सं . विदग्ध = विद्वान ] दुर्विपाक पु . वाईट परिणाम . [ दूर + सं . विदग्ध = विद्वान ] दुर्विभावनीय वि . समजण्यास , कल्पना करण्यास कठिण . [ दुर + सं . विभावनीय = कल्पना करतां येण्यासारखे ] दुर्वृत्त वि . दुराचारी ; दुर्व्यसनी ; दुर्वर्तनी . [ दुर + सं . वृत्ति = वर्तन ] दुर्व्यसन नी वि . वाईट व्यसन , संवय लागलेला ; दुराचारी ; बदफैली . ( प्र . ) दुर्व्यसनी . दुर्व्रात्य वि . अतिशय दुष्ट ; व्रात्य ; खोडकर ; खट्याळ ; ( मुलगा अथवा त्यांचे आचरण ). [ दुर + व्रात्य = खोडकर , द्वाड ] दुर्हृद , दुर्हृदय वि . वाईट , दुष्ट मनाचा . [ दुर + सं . हृदु , हृदय = मन ] दुर्ज्ञेय वि . समजण्यास कठिण ; गूढ ; गहन . ही पद्धत कशी सुरु झाली असावी हे समजणे दुर्ज्ञेय आहे . - इमूं ७६ . [ दुर + सं . ज्ञेय = समजण्याजोगे ] दुःशक वि . करण्यास कठिण ; अशक्यप्राय . [ दुस + सं . शक = शकणे ] दुःशकुन पु . अपशकुन ; अनिष्टसूचक चिन्ह . [ दुस + शील ] दुश्चरित्र न . पापाचरण ; दुष्कृत्य . [ दुस + चरित्र ] दुश्चल वि . ( अक्षरशः व ल . ) पुढे जाण्यास , सरसावण्यास , चालण्यास कठिण . [ दु + सं . चल = चालणे ] दुश्चित , दुश्चीत वि . १ ( काव्य ) अयोग्य , चुकीचा , अपराधी ( माणूस , कृत्य ). अंगुष्ठ धरुनि मस्तकपर्यंत । अखंड दुश्चित आचरलो । २ खिन्न ; उदास ; दःखी . राजा प्रजा पिडी । क्षेत्रो दुश्चितासी तोडी । - तुगा २९८४ . [ सं . दुश्चित अप . ] दुश्चित्त वि . १ खिन्न ; दुर्मनस्क ; दुःखित ; उदास ; उद्विग्न . अबदुल्याची खबर ऐकतां मनांत झाले दुश्चित्त . - ऐपो १३२ . २ क्षुब्ध . परि कुंडलिनी नावेक दुश्चित्त होती । ते तयाते म्हणे परौती । - ज्ञा ६ . २३८ . [ दुस + चित्त = मन ] दुश्चिंत वि . ( काव्य ) खिन्न ; दुःखी ; उदास ; दुश्चित्त . अर्थ २ पहा . डोळे लावुनियां न होतो दुश्चिंत । तुझी परचीत माव होती । [ दुश्चित्त अप . ] दुश्चिन्ह न . अशुभ , वाईट लक्षण ; अपशकुन . दुश्चिन्हे उद्भवली क्षिती । दिवसा दिवाभीते बोभाति । [ दुस + चिन्ह ] दुश्शाप वाईट , उग्र , खडतर शाप . [ दुस + शाप ] दुश्शासन पुविना . दुर्योधनाचा भाऊ . - वि . व्यवस्था राखण्यास , अधिकार चालविण्यास कठिण . [ दुस + शासन = अधिकार चालविणे ] दुष्कर वि . १ करण्यास कठिण ; बिकट ; अवघड . म्हणोनि अभ्यासासि काही । सर्वथा दुष्कर नाही । - ज्ञा १२ . ११३ . २ दुष्परिणामकारक . - मोल . [ दुस + सं . कृ = करणे ] दुष्कर्म न . वाईट , पापी , दुष्टपणा़चे कृत्य ; कर्म . [ दुस + कर्म ] दुष्कर्मा , दुष्कर्मी पु . दुष्ट कृत्य करणारा ; पापी ; दुरात्मा . [ दुस + कर्मन ] दुष्काल पु . अतिवृष्टि किंवा अनावृष्टि होऊन पिके बुडून अन्नाची वाण पडते तो काळ ; दुकाळ ; महागाई . जैसा रोगिया ज्वराहूनि उठिला । कां भणगा दुष्काळु पाहला । - ज्ञा ११ . ४२८ . [ दुस + काल ] म्ह ० दुष्काळात तेरावा महिना = दुष्काळांत वर्षाचे बारा महिने काढतां काढताच मुश्किल पडते . अशा वेळी अधिक मास ( तेरावा महिना ) आला म्हणजे संकटांत भर पडते असा अर्थ . दुष्कीर्ति स्त्री . अपकीर्ति ; बदनामी ; बेअब्रू . [ दुस = कीर्ति ] दुष्कृत ति नस्त्री . १ पापकर्म ; वाईट कृत्य . आणि आचरण पाहतां सुभटा । तो दुष्कृताचा कीर सेल वाटां । - ज्ञा ९ . ४१६ . २ कृतींतील , वागणुकीतील दुष्टपणा . [ दुस + कृत - ति ] दुष्प्रतिग्रह पु . जो प्रतिग्रह ( दानाचा स्वीकार ) केला असतां , स्वीकारणारा अधोगतीस जातो ती ; निंद्य प्रतिग्रह ; अशुभप्रसंगी केलेले दान स्वीकारणे ; वाईट कृत्याबाबत स्वीकारलेले दान इ० उदा० . वैतरणी , शय्या , लोखंड , तेल , म्हैस हे दुष्प्रतिग्रह होत . [ दुस + सं . प्रतिग्रह = दान स्वीकारणे ] दुष्प्राप प्य वि . दुर्लभ ; मिळण्यास कठिण ; विरळा ; दुर्मिळ . [ दुस + सं . प्र + आप = मिळविणे ] दुस्तर वि . तरुन जाण्यास , पार पडण्यास कठिण . समुद्रापेक्षां हा संसार मला दुस्तर वाटतो . - न . ( ल . ) संकट . थोर वोढवले दुस्तर । तुटले सासुरे माहेर । - एरुस्व ८ . ५५ . [ दुस + सं . तृ = तरणे ] दुस्पर्श वि . स्पर्श करण्यास कठिण , अयोग्य . [ दुस + सं . स्पृश = स्पर्श करणे ] दुस्संग पु . दुष्टांची संगत ; कुसंगति . [ दुस + संग ] दुस्सह वि . सहन करण्यास कठिण ; असह्य . [ दुस + सं . तृ = तरणे ] दुस्सही वि . ( प्र . ) दुस्सह - स्सह अप ] दुस्साध्य वि . १ सिद्धीस नेण्यास , साधावयास कठिण . थोर वय झाल्यावर विद्या दुःसाध्य होते . २ बरा करण्यास कठिण ( रोग , रोगी ). आटोक्यांत आणण्यास कठिण ( शत्रु , अनिष्ट गोष्ट , संकट इ० ). [ दुस + सं . साध्य = साधण्यास सोपे ] दुस्स्वप्न न . १ अशुभसूचक स्वप्न . २ ( मनांतील ) कुतर्क , आशंका , विकल्प . [ दुस + स्वप्न ] दुस्स्वभाव पु . वाईट , दुष्ट स्वभाव . - वि . वाईट , दुष्ट स्वभावाचा . [ दुस + स्वभाव ]

दुर     

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English
दुर   1. = दुर्1 only in शत- (q.v.)
दुर  m. 2.m. (perhaps √ दॄ) ‘one who opens or unlocks’, giver, granter (= दातृ, [Sāy.] ), [RV. i, 53, 2; vi, 35, 5.]

Related Words

दुर   दुर करणे   electric remote control switchboard   दभ्न   दुरून   पापनिरसन   दूरदेशी   इदबार   दुघाड भरणे   प्रदीर्घ   नजरनछावर   नोच्छावर   सुदुरारुह   कपाळ अढी   बघा   अहुळी   कुठपर्यंत   कुठपावेतों   दुमेळावा   दुरुदाहर   दुर्णीत   दुर्निरीक्ष्य   दुर्मेळावा   दुष्कुल   बघ्या   गरीबाला सोन्यारुप्याचा विटाळ   जाणतें लेकरूं। माता लागे दूरी धरूं।।   खल्लाळ   कुठवर   दूडाश   नाहाट   दुवाळी   ओवंडा   उकाल   अलगत   दुरोदर   द्वार्   कोलणें   दुराही   ओत   ख्याती   अलग   दुर्दम   change   ख्याति   कांटा   केंद्र   पार्श्व   दु   अठरा   कान   दूर   कृ   दुर्   હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત   ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା   વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે   સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના   ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને   બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી   ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ   బొప్పాయిచెట్టు. అది ఒక   लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो   आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै   भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता   नागरिकता कुनै स्थान   ३।। कोटी   foreign exchange   foreign exchange assets   foreign exchange ban   foreign exchange broker   foreign exchange business   foreign exchange control   foreign exchange crisis   foreign exchange dealer's association of india   foreign exchange liabilities   foreign exchange loans   foreign exchange market   foreign exchange rate   foreign exchange regulations   foreign exchange reserve   foreign exchange reserves   foreign exchange risk   foreign exchange transactions   foreign goods   foreign government   foreign henna   foreign importer   foreign income   foreign incorporated bank   foreign instrument   foreign investment   foreign judgment   foreign jurisdiction   foreign law   foreign loan   foreign mail   foreign market   foreign matter   foreign minister   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP