Dictionaries | References

तरता

   
Script: Devanagari

तरता     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Floating or afloat. 2 fig. That is in good hands or under profitable employment; engaged lucratively or without risk--money.

तरता     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  Floating. That is under profitable employment.

तरता     

वि.  अंती किफायतशीर ठरणारा , न बुडणारा ( उद्योग , धंदा ).

तरता     

वि.  १ तरणारा ; तरंगणारा . २ ( ल . ) बुडण्याची भीति नसलेला ; किफायतशीर ; फायदेशीर ( धंदा , व्यवहार इ० ). ३ चांगल्या ठिकाणी गुंतविलेला ; न बुडणारा ( पैसा ). ४ वसूल देण्यासारखा ; न बुडविणारा ( ऋणको ). [ सं . तृ = तरणे ]
०पंथ  पु. सुरक्षित मार्ग ; सुटकेचा ; संरक्षणाचा , बचावाचा मार्ग , उपाय . तरत्या पंथास लागणे ( एखाद्या संकटग्रस्त , आजारी माणसाने जिवावर बेतलेल्या संकटांतून , आजारांतून ) पार पडण्याची , निभावण्याची , बचावण्याची चिन्हे व्यक्त करणे ; आजारांतून उठणे ; चांगले दिवस येऊ लागणे .
०बुडता वि.  १ भरभराटीस आलेला किंवा डबघईस आलेला ( व्यापारी इ० ). २ फायदेशीर किंवा आंतबट्ट्याचा ( धंदा , व्यवहार , रोजगार , काम , प्रकार , मसलत इ० ). [ तरणे + बुडणे ] ते बुडते पाहणे ( एखाद्या धंद्यातील , व्यवहारांतील , सट्ट्यांतील ) नफानुकसान विचारांत घेणे ; बर्‍यावाईट परिणामांचा , उलटसुलट बाजूंचा विचार करणे . ती खाडी स्त्री . नेहमी ( होडी इ० नी ) ओलांडतां येणारी खाडी . तरते वि . ( तरणारे ) वसूल होण्यासारखे ; कर्ज न बुडविणारे ; घरंदाज ( कूळ इ० ). तरता पहा .
०कूळ  न. कर्ज दिले असतां बुडविणार नाही असे कूळ ; खात्रीचे कूळ .
०बंदर  न. १ ज्यांत पाणी भरपूर असल्याने गलबते , होड्या इ० नेहमी तरंगूं शकतात असे बंदर . २ ज्यांत किनार्‍यापर्यंत जहाज जाऊं शकेल असे बंदर .
०बुडते  न. लाभहानि ; नफातोटा . - वि . तरता बुडता पहा .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP