मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भारुडे|
वासुदेव - धन्य जगी तोचि एक हरिरंगी ...

भारुड - वासुदेव - धन्य जगी तोचि एक हरिरंगी ...

भारुड Bharude is a kind of satirical form of presenting the faults of lay human beings. It was started by Eknath who is revered as a saint.

 


धन्य जगी तोचि एक हरिरंगी नाचे ।

रामकृष्ण वासुदेव सदास्मरा वाचे ॥१॥

सुखदु:ख समान सकळ जीवांचा कृपाळ ।

ज्ञानाचा उद्‌बोध भक्‍तिप्रेमाचा कल्लोळ ॥२॥

विषयी विरक्‍त जया नाही आपपर

संतुष्ट सर्वदा स्वयें व्यापक निर्धार ॥३॥

जाणीव शहाणीव वोझे सांडूनिया दूरी ।

आपण वस्तीकर वर्ततसे संसारी ॥४॥

एका जनार्दनी नित्य हरीचे कीर्तन ।

आसनी शयनी सदा हरीचे चिंतन ॥५॥

N/A

N/A
Last Updated : November 10, 2013

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP