मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भारुडे|
गोंधळ - अंबऋषीकारणें गर्भवास सोसि...

भारुड - गोंधळ - अंबऋषीकारणें गर्भवास सोसि...

भारुड Bharude is a kind of satirical form of presenting the faults of lay human beings. It was started by Eknath who is revered as a saint.

अंबऋषीकारणें गर्भवास सोसिशी वेद नेतां चोरुनी ब्रह्मिया आणुनी देसी ॥ १ ॥

उदो बोला उदो कृष्णाबाई माउलीचा हो । उदो बोला उदो रामाबाई माउलीचा हो ॥ध्रु०॥

हस्त लागला शंखासुर पूजापद देसी । मत्स्यरूपीया हरी सागर धुंडिसी ॥ २ ॥

रसातळां जातां पृथ्वी पाठीवरी घेसी । परोपकाराकारणें तळीं कांसव जाहलासी ॥ ३ ॥

दाढें धरुनी अवनी वराहरूप घेसी । त्रिभुवन धुंडोनि चंद्र सूर्यातें आणिसी ॥ ४ ॥

प्रल्हादाकारणें स्तंभीं गुरगुरसी । रक्षूनियां भक्त हिरण्यकश्यपु वधिसी ॥ ५ ॥

सर्व समर्पण केलें म्हणोनि प्रसन्न होसी । चिमणे रूप धरूनी बळीचें द्वारपाळपण करसी ॥ ६ ॥

सहस्त्र अर्जुनालागीं परशुराम होसी । वधोनि दैत्यांसी पृथ्वी ब्राह्मणां देसी ॥ ७ ॥

पितृवचनें करुनी वनवास वो करसी । सीतेचेनि कैवारें रावणकुंभकर्णा वधिसी ॥ ८ ॥

गोकुळीं नंदाघरीं रामकृष्ण तूं होसी । चोरूनि नवनीत खाउनी कंसासी वधिसी ॥ ९ ॥

धर्म लोपला अधर्म जाहला हें तूं न पाहसी । यालागीं बौद्धरूपें पंढरी नांदसी ॥ १० ॥

कलंकी अवतार श्रीहरी पुढें तूं घेसी । एका जनार्दनीं शरण सर्व भावेंसी ॥ ११ ॥

N/A

N/A
Last Updated : November 10, 2013

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP