मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भारुडे|
अंबा - नमो अनादि माया भगवती । मू...

भारुड - अंबा - नमो अनादि माया भगवती । मू...

भारुड Bharude is a kind of satirical form of presenting the faults of lay human beings. It was started by Eknath who is revered as a saint.

नमो अनादि माया भगवती । मूळपीठ निवासिनी । स्वयें ज्योति अविनाशिनी । जगदंबे माये उभी राहे ॥ १ ॥

तूं ते पहावया दृष्टी । हरिहर ब्रह्मा तप करिती । तरी त्यांसी नव्हे तुझी प्राप्ती । तूं प्रत्यक्ष येथें प्रगटलीसी । बया उभी रहाये ॥ २ ॥

आली रे आली भवानी आली भवानी आली ॥ध्रु०॥

तिशी सिद्ध आसन देऊनी । बरवी पूजा करुनी । वरी खेळणा पाळणा टांगोनी पूजिली अविनाश भवानी ॥ ३ ॥

समसाम्य समान । अढळ तुझें सिंहासन । सच्चिदानंदासी गादी जाण । तेथें सुखासन पैं तुझें ॥ ४ ॥

पावावया तुझी प्राप्ती । साधन चतुष्टय संपत्ती । जोडोनियां याचक योजिती । प्रत्येका नीतिचेनि योगें ॥ ५ ॥

जे मज होमिती साधनीं । ऐसें भक्त भजन देखुनी । तेणें भावार्थ योग संतोषोनी । निजपददानीं तूं होसी ॥ ६ ॥

तूं त करावया प्रगट । तें सर्वही झालें पोंचट । मग होती तो सर्व अदृष्ट । अंबा स्वयंभ प्रगटली ॥ ७ ॥

त्यास होमाची परी । सांगोनियां अवधारी । यज्ञमंडप कुसरी । अभिनव लहरी उठलीसे ॥ ८ ॥

तेथें विधान करावें दत्तात्रयाची । बाहेर मेखळा त्रिगुणाचीं । आंत मूर्ति जगदंबेची । आव्हानिली ॥ ९ ॥

तेथें ॐकार षट्‌कार । बीजात्मक नाम नामोच्चार । द्रव्य अर्पी अपार । अति पवित्र अवदानी ॥ १० ॥

दश इंद्रियां आदि आहुती । मनासहित दिधली निश्चिती । अहंकार मेंढा बळी देऊनि पूर्ण आहुती । आई भवानी संतोषविली ॥ ११ ॥

मोह महिषासुराचा करावया घात । अंबा कडाडोनि दांत खात । तो धाकचि निमाला निश्चित । पूर्णानंद प्रगटला ॥ १२ ॥

तुझा गोंधळी नेटका । बळीराम महा सखा । तेणें आत्मनिवेदन करूनि देखा । तुजलागीं माये उभे केलें ॥ १३ ॥

एका जनार्दनीं निर्धारीं । अखंड पुंडलिकाचे द्वारीं । दोन्ही चरण विटेवरी । जोडोनि निर्धारीं उभी राहे ॥ १४ ॥

N/A

N/A
Last Updated : November 10, 2013

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP