मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भारुडे|
गौळण - ऎक ऎक सखये बाई । नवल मी स...

भारुड - गौळण - ऎक ऎक सखये बाई । नवल मी स...

भारुड - गौळण

ऎक ऎक सखये बाई । नवल मी सांगू काई ।
त्रैलोक्याचा धनी तो हा यशोदेस म्हणतो आई ।
देवकीने वाहीला गे यशोदेने पाळिला ।
पांडवांचा बंधुजन होऊनीया राहिला ॥ १ ॥
ब्रह्माडांची साठवण योगीयांचे निजध्यान ।
चोरी केली म्हणोनिया उखळाशी बंधन ॥ २ ॥
सकळ तीर्थे ज्याचे चरणी । सुलभ हा सुलभ पाणी ।
राधिकेस म्हणतो तुझी करितो मी वेणी फणी ॥ ३ ॥
एका जनार्दनी कैवल्याचा मोक्षदानि
गायी गोप गोप बाळा मिळविली आपुलेपणी ॥ ४ ॥

N/A

N/A
Last Updated : November 10, 2013

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP