मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भारुडे|
जोशी - माझा शकुन ऎका भाई । चार व...

भारुड - जोशी - माझा शकुन ऎका भाई । चार व...

भारुड - जोशी


माझा शकुन ऎका भाई । चार वेद देती ग्वाही ।
सहा शास्त्रेंवदती पाही । तेचि धरूनी रहा ॥ १ ॥
सावध नाना सावधनाना । समज काही तरी धरी मना ॥ध्रु॥
नका जाऊ आडवाटे । तेथे लागती चपेटे ।
दात विचकुनी पडसी नेटे । उगेच पहा ॥२॥
गेले सरले मागील फेरे । आता दिवस आले बरें ।
विघ्न नाहीसे जाले सारे । सावध रहा ।३॥
एका जनार्दनींचा जोशी । होरा सांगतो संताशी ।
ऎकता जातील मोक्षच दासी ।
नायकता पडतीलचौर्‍याऎंशी । हेचि पहा ॥४॥

N/A

N/A
Last Updated : November 10, 2013

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP