मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भारुडे|
जोहार - जोहार मायबाप जोहार । मी स...

भारुड - जोहार - जोहार मायबाप जोहार । मी स...

 भारुड Bharude is a kind of satirical form of presenting the faults of lay human beings. It was started by Eknath who is revered as a saint.

जोहार मायबाप जोहार । मी सूर्यवंशीं रामजी पाटलाचा महार । त्याचे दरबारचा कारभार । मज नफराचे शिरीं की० ॥ १ ॥

काय सांगूं अयोध्या पट्टण । महास्थळ मनोहर जन । तेथें नांदते कोण कोण । ते सकळ परिसा की जी मायबाप ॥ २ ॥

ते अयोध्येसी दिलपत राजा । त्याचे पोटीं दशरथ वोजा । त्याचे शकुनावरती फौजा । चालिल्यात की० ॥ ३ ॥

त्याचे पोटीं राम जगजेठी । कांबीट मोडली पणासाठीं । विन्मुख करूनी रायाच्या कोटी । तंव मुक्ताई वर्णिली की ॥ ४ ॥

ती मुक्ताई आवा मोठी कनवाळा । टुकडा देती पाका शिळा । काय सांगते वेळोवेळां । मज हरिख होतो की० ॥ ५ ॥

परी मी जातीचा महार । धन्याचे चाकरीस सादर । सालोबाद धन्याचे घरचा कारभार । मीच करीत आलो की० ॥ ६ ॥

मग जाउनी विष्णुबा कुळकर्णांचे घरीं । हकीकत सांगितली सारी । मग देऊनि शिळी पाकी न्याहारी । मज बैस म्हणितलें की० ॥ ७ ॥

गाढा विष्णुबा कुळकर्णी । सार्‍या कारभार्‍यांचा तो धनी । चौर्‍यांयशी लाखांची वांटणी । तेणेंच केली की जी मायबाप ॥ ८ ॥

चौर्‍यांयशी लाख वानभरें । विष्णुबा कुळकर्ण्यांची खिल्लारें । पोषीत पाळीत वोहरें । ऐसेंच की० ॥ ९ ॥

मग मृत्युलोकीं उभविल्या पेंठा । पूर्वी त्या निवृत्ति दाविल्यां वाटा । सोडोनियां जुनाट वाटा । या आडवाटा जाऊं नका की० ॥ १० ॥

मग मृत्युलोकीं केले येणें । गोउनी पाहिलें मागिल्या रिणें । फिटल्यावांचून समाधान । होत नाहीं की० ॥ ११ ॥

अवघे पांच कोश शेत । पाडुनी केलें तन गवत । पडिकाचे पैसे देतां बोभाट । होईल की जी मायबाप ॥ १२ ॥

सालोबाद मारितों हाका । वसुल करा दिवाणचां टका । तोंवर येणें जाणें धोका । न वारे की० ॥ १३ ॥

मग आरोळी देउनी घातली उडी । एका काढिल लवडसवडी । एका ते उत्तानीं उफडी । वाहवलें की० ॥ १४ ॥

एक पडिलें खळाळ धारें । वरते पाय खालते शिर । त्यांचे हाल थोर थोर देखिले की० ॥ १५ ॥

मग जाऊन जनार्दनबावाचे दरबारीं । बैसोनि एकनाथ पायरी । माप केलें खरोखरीं । मागील भरोवरी चुकविली की जी मायबाप ॥ १६ ॥

N/A

N/A
Last Updated : November 10, 2013

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP