नसोनि नवल असती अबला । करिती गलबला वाउगाची ॥ १ ॥
ब्रह्मज्ञानीयासी स्त्रीनें खादलें । त्याच्या धांवण्या देव पातले ॥ २ ॥
येऊनि पाहतां देव नागवला । काहीं नाहीं तेथें उगाचि ठेला ॥ ३ ॥
न बोलवे गोष्टी मुकियाची परी । खादला गूळ परी न सांगवे गोडी ॥ ४ ॥
एका जनार्दनीं विपरीत देखिले । ब्रह्मज्ञान पळालें घरोघरीं ॥ ५ ॥