मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भारुडे|
पिंगळा - पिंगळा महाद्वारीं । बोली ...

भारुड - पिंगळा - पिंगळा महाद्वारीं । बोली ...

भारुड Bharude is a kind of satirical form of presenting the faults of lay human beings. It was started by Eknath who is revered as a saint.

पिंगळा महाद्वारीं । बोली बोलतो देखा । शकुन सांगतों तुम्हां हा एक ऐका ॥ १ ॥

डुग डुग ऐका डुग डुग ऐका ॥ध्रु०॥

पिंगळा बैसोनि कळसावरी । तेथोनि गर्जतो नानापरी । बोल बोलति अति कुसरी । सावध ऐका ॥ २ ॥

किलबिल किलबिल । चिलबिल चिलबिल । तुलमिल तुलमिल । तुलबिल तुलबिल ॥ ३ ॥

तुमचें गांवींचा एक ठाणेदार । गांवच्या पाटलाची एक थोरली नार । तिसी रतला तो करा विचार । एका जनार्दनीं बोले सारासार विचार ॥ ४ ॥

N/A

N/A
Last Updated : November 10, 2013

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP