मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भारुडे|
माळी - आत्माराम आपण वनमाळी । ...

भारुड - माळी - आत्माराम आपण वनमाळी । ...

भारुड Bharude is a kind of satirical form of presenting the faults of lay human beings. It was started by Eknath who is revered as a saint.

 


आत्माराम आपण वनमाळी ।

ज्ञानकुदळी घेऊनि वाफे चाळी ।

जाई जुई लाविल्या दोन्ही वोळी ।

निजयोगिनी शिंपिती वेळॊवेळी ॥१॥

पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण वो ।

या मळ्याचे सारखे चारी कोन हो ।

रक्षण तेथे ठेविलें पाच जण हो ।

प्राणापान व्यान उदान सम हो ॥२॥

बावन पायर्‍या रे विहीर निर्धारी ।

सतत उपसा होतसे परोपरी ।

ऎसी विहीर वोळली क्षीरसागरी हो ॥३॥

वोडवेचे चाक सत्रावी घडघडाट हो ।

सोहं दोर लाविला याला नीट हो ।

शांतीक्षमेची राहतसे मोट हो ।

निजनयना चालविला पाट हो ॥४॥

हाती खुरपे घेतले विवेकाचे ।

समूळ मूळ खुरपिले वासनेचे ।

प्रत्यक्ष फळ लाधले आत्म साचे हो ।

एका जनार्दनी माळी तेथे नाचे हो ॥५॥

N/A

N/A
Last Updated : November 10, 2013

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP