मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भारुडे|
मानभाव - आता मानभाव झालो भिक्षा वा...

भारुड - मानभाव - आता मानभाव झालो भिक्षा वा...

भारुड Bharude is a kind of satirical form of presenting the faults of lay human beings. It was started by Eknath who is revered as a saint.

 


आता मानभाव झालो भिक्षा वाढा बाई ॥ध्रु॥

मुळीचाची मानभाव वस्त्रे काळी केली ।

कोरके मागुन झॊळी भरली । उलटी काठी धरली ॥१॥

सोन्यारुप्याचे देव आम्ही मोडूनियां खाऊं ।

शेंद्राचे देव आम्ही दृष्टी ना पाहू ॥२॥

एका जनार्दनी मानभाव झाला ।

झॊळीवरती झॊळी ठेवूनी गडबड गुंडा केला ॥३॥

N/A

N/A
Last Updated : November 10, 2013

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP