अगे ऐके भटणी । कां बोलसी चावटनी । जन्मांतरी पाळिलें म्हणोनि । उपकार फेडिसी ॥ १ ॥
काय बोललीस बोल । अवघा सारा फोल । अंगीं नाहीं भक्तीची बोल । भटणी तुझ्या ॥ २ ॥
कामक्रोध माजली । विषयानें भुलली । गुरुकृपा नाहीं जाली । भटणी तुजला ॥ ३ ॥
अहंकार सोडोनी देई । सद्गुरूसी शरण जाई । भक्तिसुखें तूं राही । हो भटणी ॥ ४ ॥
भट बोलला बोली । भटणीची अहंता गेली । भटणी ती स्थिर जाली । एका जनार्दनाचे पायीं ॥ ५ ॥