मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भारुडे|
जोहार - देहपूरचें दिले ठाणें । जि...

भारुड - जोहार - देहपूरचें दिले ठाणें । जि...

भारुड Bharude is a kind of satirical form of presenting the faults of lay human beings. It was started by Eknath who is revered as a saint.

देहपूरचें दिले ठाणें । जिवाजीस बोलावणें । मग पळूं लागले रानोरानें । कोण सोडवी त्याकारणें । की जी मायबाप जोहार ॥ १ ॥

येईल यमाजीची पाळी । कोण तेथें कोणा सांभाळी । जिवाजी पळतील गांवचे बळी । होईल फजिती सारी की० ॥ २ ॥

अवघे राहतील घरचे घरीं । तुम्ही पडाल चौर्‍यांयशीच्या फेरी । किती जन्म वेरझारी । करा विचार याचा की० ॥ ३ ॥

शरण एका जनार्दनीं । मायबाप संत धनी । तेचि चुकवितील यातनी । धरा विश्वास की जी मायबाप जोहार ॥ ४ ॥

N/A

N/A
Last Updated : November 10, 2013

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP