मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भारुडे|
वाघ्या - अहं वाघा साहं वाघा प्रेमन...

भारुड - वाघ्या - अहं वाघा साहं वाघा प्रेमन...

भारुड Bharude is a kind of satirical form of presenting the faults of lay human beings. It was started by Eknath who is revered as a saint.

 


अहं वाघा साहं वाघा प्रेमनगरा वारी ।

सावध होऊनि भजनी लागा देव करा कैवारी ॥ १ ॥

मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी ॥ धृ. ॥

इच्छा मुरळीस पाहू नका पडाल नरकद्वारी ।

बोध बुधली ज्ञान दिवटी उजळा महाद्वारी ॥ २ ॥

आत्मनिवेदन रोडगा निवतील हारोहारी ।

एका जनार्दनी धन्य खंडेराव त्यावर कुंचा वारी ॥ ३ ॥

N/A

N/A
Last Updated : November 10, 2013

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP