रंगीं नाचे क्षेत्रपाळ । आग्या चैतन्य वेताळ । ब्रह्मानंदाचा गोंधळ । सुख सुकाळ माजविला ॥ १ ॥
सिद्धा जाग रे जगजोगी । सिद्धा जाग रे जगजोगी ॥ध्रु०॥
अनुहाताची डंबरी । बोध त्रिशूळ घेउनी करीं । नाचें चैतन्य चाचरीं । मुख साहाकारी बहिरव ॥ २ ॥
चित्त चैतन्य योगिनी । मोह महिषासुर मर्दिनी । एका जनार्दनाचे चरणीं भवभवानी नाचती ॥ ३ ॥