मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भारुडे|
जोहार - जोहार मायबाप जोहार । देशम...

भारुड - जोहार - जोहार मायबाप जोहार । देशम...

भारुड Bharude is a kind of satirical form of presenting the faults of lay human beings. It was started by Eknath who is revered as a saint.

जोहार मायबाप जोहार । देशमुख देसाई ठाणेदार । जिवाजीपंत हुद्देदार । करती कारभार गांवचा की जी मायबाप ॥ १ ॥

गांव वसविला धन्यानें । दहा रस्ते पंचवीस ठाणें । सात खिडक्या गांव कोश पेणें । तेथें आहेत की० ॥ २ ॥

गांवची पांढर परिपूर्ण । नांदती शेटे आणि महाजन । जिवाजीस अभय देऊन । पाठविलें धन्यानें की० ॥ ३ ॥

जिवाजी आले गांवांत । गांव पाहिला दरोबस्त । कारभारी घेउनी आपले हातांत । वागवूं लागले की० ॥ ४ ॥

जोंवरि नव्हती आवाजीची भेट । तोंवरी जीवाजीनें भरली पेठ । जाहला सर्व गांवचा बोभाट । आवाजीचें नावें की० ॥ ५ ॥

आवाजीनें नाशिला गांव । मोडला धन्याच्या बाकीचा ठाव । शेवटीं जिवाजीचें वैभव । जाईल की० ॥ ६ ॥

जिवाजी तुमचें नाहीं धड । यमाजीबावाची होईल होड । तुम्हांवर हें सांकड । येईल की० ॥ ७ ॥

आवाजीचें करा काळें तोंड । इचे पायीं तुम्हांवर येईल बंड । शेवटीं यमाजीचा दंड । न चुके की० ॥ ८ ॥

कांही ठेवाल धन्याची बाकी । तर सोडाल जागा होईल पारखी । एका जनार्दनीं वोळखी । धन्याची तुमची नोहे की० ॥ १० ॥

N/A

N/A
Last Updated : November 10, 2013

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP