मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भारुडे|
सौरी - भोळा दादुला बाई म्यां केल...

भारुड - सौरी - भोळा दादुला बाई म्यां केल...

भारुड Bharude is a kind of satirical form of presenting the faults of lay human beings. It was started by Eknath who is revered as a saint.

भोळा दादुला बाई म्यां केला । संसार सारा नागविला ॥ १ ॥

सौरी होऊन गेलें सुख नाहीं झालें । पुनरपि संसारी मी हो आलें ॥ २ ॥

चार पांच साहा अठरांसी रतलें । त्यांचे संग मन चावट हो झालें ॥ ३ ॥

एकाएकीं संतसंग झाला । एका जनार्दनीं संसार तुटला ॥ ४ ॥

N/A

N/A
Last Updated : November 10, 2013

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP