आम्हीं नवल देखिलें । कान्होबा तुज लागे बोले ॥ १ ॥
कैशी नवलाची मात । म्हातारी ती तरणी होत ॥ २ ॥
अमावस्येच्या दिवशीं चंद्र देखिला । राहू केतु येउनी ग्रहणीं लागला ॥ ३ ॥
आपुलेनि मनें आकाश पोळलें । अकस्मात जाऊनि समुद्रीं नाहालें ॥ ४ ॥
समुद्रांतील आटलें पाणी । एका जनार्दनीं जहाली कहाणी ॥ ५ ॥