मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भारुडे|
संसार - सांगते तुम्हा वेगळे निघा ...

भारुड - संसार - सांगते तुम्हा वेगळे निघा ...

भारुड Bharude is a kind of satirical form of presenting the faults of lay human beings. It was started by Eknath who is revered as a saint.

 


सांगते तुम्हा वेगळे निघा ।

वेगळे निघून संसार बघा ॥ १ ॥

संसार करता शिणले भारी ।

सासू सासरा घातला भरी ॥ २ ॥

संसार करिता शिणले बहु ।

दादल्या विकून आणले गहू ॥ ३ ॥

गव्हाचे दिवसे जेविली मावशी ।

मजला वेडी म्हणता कैसी ॥ ४ ॥

संसार करिता दगदगले मनी ।

नंदा विकिल्या चौघीजणी ॥ ५ ॥

एका जनार्दनी संसार केला ।

कामक्रोध देशोधडी गेला ॥ ६ ॥

N/A

N/A
Last Updated : November 10, 2013

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP