जया परमार्थी चाड । तेणे सांडावे लिगाड ।
धरूनी भजनासी चाड । नित्य नेम आदरे ॥१॥
सांडी मांडी परती टाकी । वासुदेव नाम धोकी ।
मोक्ष येईल सुखी । नाम स्मरता आदरे ॥२॥
रामकृष्ण वासुदेवा । धरी हाचि दृढभावा ।
आणिकाचा देवा । दुरी करी आदरें ॥३॥
घाली संतांसी आसने । पूजा करी काया वाचा मने ।
एका जनार्दनी जाणें । इच्छिले ते पुरवी ॥४॥