मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भारुडे|
गौळण - असा कसा देवाचा देव बाई ठक...

भारुड - गौळण - असा कसा देवाचा देव बाई ठक...

भारुड - गौळण


असा कसा देवाचा देव बाई ठकडा देव एका पायानी लंगडा ॥ धृ. ॥
गवळ्याघरी जातो । दहीदूश चोरूनी खातो। करी दुधाचा रबडा ॥ १ ॥
शिंकेची तोडितो । मडकेचि फोडितो । पाडी नवनीताचा सडा ॥ २ ॥
वाळवंटी जातो । कीर्तन करतो । घेतो साधूसंतांशी झगडा ॥ ३ ॥
एका जनार्दनी । भिक्षा वाढा बाई । देव एकनाथाचा बछडा ॥ ४ ॥

N/A

N/A
Last Updated : November 10, 2013

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP