मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भारुडे|
चोपदार आला चोपदार आला ॥धृ...

चोपदार - चोपदार आला चोपदार आला ॥धृ...

भारुड - चोपदार


चोपदार आला चोपदार आला ॥धृ॥
माझे चोपदाराचे राहणे ।
आकाश स्वर्ग पाहणे ।
चतुर्मुख ब्रह्मा चकित होऊन ।
निराकारींची वस्ती दिधली विष्णूने ॥ १ ॥
शंख चक्र गदा घेऊन ।
महादेवी शून्य द्वारपाळ जाण ।
कळिकाळा टाकिन छेदून ।
रंडी चंडीशक्‍ती टाकीन भेदून ।
चोपदार आहे मी जाण ॥ २ ॥
आम्हांस नाही उपाय ।
आम्हांस नाही बाप ना माय ।
खरी चाकरी कोठे करावी ।
एका जनार्दनी दृढ धरावी ॥ ३ ॥

N/A

N/A
Last Updated : November 10, 2013

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP