संगीत मृच्छकटिक
मराठी संगीत नाटक ही मराठी रंगभूमीला रामप्रहरी पडलेले एक सुखद स्वप्न होय.
(त्रिताल) (१८९०). संगीत : खुद्द नाटककार
१
सार्थचि ते वदति ॥ लोकीं ॥ प्रारब्धाची गति न कळे ती ॥धृ०॥
सारसादि जे बलि भक्षुनिया ॥ क्रीडत होते सदनांगणि या
वाढे सांप्रत तृण त्या ठाया । पुण्यबली हा कीटक खाती
२ (ठुंबरी, चाल : बैरागी मोरे राम)
मरण बरें वाटतें । दारिद्रयाहुनि मित्रा तें ॥धृ०॥
दु:ख एकदां त्या मरणाचें । परि होतें जे दारिद्रयाचें
सततचि तें जाळितें ॥१॥
३ (चाल : आले वनमाळी रात्री)
दासी ऐसें मानुनियां कार्य मला सांगतसे
सुदिन काय उगवला आज मनीं वाटतसे ॥धृ०॥
मधुर जातिसुमनांचा वास येत असे
यौवनभर म्हणुनि याचा खास अजुनि पूर्ण असे ॥१॥
४ (चाल : आज रहो मेरे प्यारे)
काय कळा ही सदना आली ॥धृ०॥
सपरिवार ती लक्ष्मी जाता । कुदशा भेसुरि आंत रिघाली ॥१॥
मित्रपरिजनी पूर्ण असावें । उदास दिसतें तें या कालीं ॥२॥
जैसी तरुची पालवि गळतां । उरे शुष्कता ती स्थिती झाली ॥३॥
५ (राग : कानडी, त्रिताल)
रजनिनाथ हा नभी उगवला । राजपथीं जणुं दीपचि गमल ॥धृ०॥
नवयुवतीच्या निटिलासम किति । विमल दिसे हा ग्रहगण भोवती
शुभ्रकिरण घन तिमिरी पडतीं । पंकी जेविं पयाच्या धारा ॥१॥
६
माडिवरी चल ग गडे जाऊं झडकरी
पाहु सदय दानशूर मूर्ति ती बरी ॥धृ०॥
मी अधीर दर्शनासि फार अंतरी
होईल सुख मजसि तया पाहिल्यावरी ॥१॥
७ (ठंबरी, चाल : व्यर्थ आम्ही अबला)
रमवाया जाऊं । प्रियासी । रमवाया जाऊं ॥धृ०॥
मेघ असो कीं रात्र असो ही । पर्जन्याची वृष्टी पडो ही
भीति तयाची मजला नाही । विघ्न कांही येऊं ॥१॥
८ (चाल : उभि जवळ खरी ती)
त्या मदनमनोरम रूपी, मन माझें गुंतुनि गेले
कधि वाहिन काया त्यासी, प्रेमें ही ऐसें झाले
दिवस तो पूर्ण सौख्याचा, येईल मग कवण्या काळी
(चाल) गुणरुप चिंतनी पाही । झोप मज नाहीं
शयनिं मी निजलें । किती तरंग ह्रदयीं उठले ॥१॥
९ (राग : तोडी, त्रिताल)
जन सारे मजला म्हणतील कीं ॥धृ०॥
दारिद्रयाने बहुतचि छळिलें
धन त्या जवळी कांहिन उरलें
म्हणुनि कर्म हें अनुचित केलें
ऐसें दूषण देतिल कीं ॥१॥
१० (राग : मल्हार, त्रिता)
आनंदे नटती । पाहुनि ज्या गृहमयूर पंक्ती ॥धृ०॥
गमनोत्सुक हे हंस असुनिया । धैर्य नसे त्या गमन कराया
कामुक गगनासम रोधाया । मेघ पहा फिरती ॥१॥
११ (दिंडी)
बघुनि वाटे या नील पयोदातें
हरिच दुसरा कीं आक्रमी नभातें
बलकांची शंखसी करी माला
तडित्पीतांबरा बांधिला कटीला ॥१॥
१२ (त्रिताल)
चपलासंगे या जलधारा । दिसति विमल रजताच्या तारा
सौदामिनिच्या स्फुरणें होती । नष्ट परीक्षण दृष्य मागुती
भासे जणुं भूमीवरि पडती । गगनपटाच्या दशा झरारा ॥१॥
१३ (राग : वसंत बिहार, त्रिताल)
जलधरसंगे नभ भरलें ते । वासित झालें सौरभवाते ॥धृ०॥
कांता जैसी प्रियतम पतिला । आलिंगन दे तशि ही चपला
धांवुनि वेगें या मेघाला । प्रेमें आलिंगन बघ देते ॥
१४ (साकी)
मेघा अति गंभीर रवानें करी गर्जना आतां ।
स्पर्शे रोमांचित मी झालों आलिंगी मज कांता ॥
मन्मथ संचरला । कदंबसुमता ये तनुला ॥१०॥
१५ (राग : मालकंस, त्रिताल)
तेचि पुरुष दैवाचे । धन्य धन्य जागिं साचे ॥धृ०॥
अंगे भिजली जलधारांनी । ऐशा ललना स्वयें येऊनी ॥
देती अलिंगन ज्यां धांनुनी । थोर भाग्य त्यांचें ॥१॥
१६ (दिंडी)
जेथ मित्रा तत्त्वार्थ पहायाला ।
शक्ति नसते भुपाल लोचनांला ॥
तिथें वक्त्याला दैन्य रोकडें तें ।
समज अथवा बहु निंद्य मरण येतें ॥१॥
१७ (चाल : रमाकांत न ये आजि सये)
हा सकल देह रक्तचंदनें विलेपिला ।
यज्ञपशूसम यांनीं सजविलें मला ॥धृ०॥
कुदशा ही ऐसी बघुनि ।
ढाळिती जन अश्रु नयनीं ॥
दोष देति धिक्कारुनि । मनुजयोनिला ॥१॥
रक्षाया बल न म्हणुनि ।
वदती हे कर जोडुनि ।
दीर्घकाल सुरभुवनीं । होउं सुख तुला ॥२॥
१८ (चाल : आरती-पांडुनृपति जनक जया)
बाळा घालोनिया गळां । रक्तसुमनांच्या माळा ॥
स्कंधाववरि स्थापियला । लोहशूल हा ॥१॥
ऐसें वत्सा नेति मला । कंठ माझा चिरायाला ॥
यज्ञकालिं जैसें पशुलां । नेति ओढुनि ॥२॥
१९ (राग : आसावरी, त्रिताल)
काय वधिन मी ती सुमती । नवयुवती अबला साश्रुलोचना ।
धरुनि कुरलकुंतल या हाती ॥धृ०॥
कोमल कुसुमति लता कधी ही । लववुनि कुसुमे खुडिली नाहीं ॥
आजवरी तीं ॥१॥
२० (पद : ललत, त्रिताल)
सखे शशिवदने । किती रुचिर, बिंबसम अधर परम सुकुमार ॥धृ०॥
अमरसुधा तव पिउनि कसें गे ॥
अयशोविष मी सेविन सांगे । विधुकर शुचि वदने ॥१॥
२१ (चाल : जो मम नयन चकोरा इंदू)
जो या नगरा भूषण खरा ॥ जैसा भाळी शोभे हिरा
ज्याच्या सद्गुणानी गिरा । रंगली सुजनांची ॥१॥
निर्धन असतां धनदापरी ॥ औदार्याते अंगी धरी
दुर्दैवाने छळिले तरी ॥ शाल न सोडी जो ॥२॥
करि जो दीनावरती दया ॥ लोकी वागे पाहुनि नया
वाहिली ही मी काया तया । निर्मळ भावाने ॥३॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP