संगीत उग्रमंगल
मराठी संगीत नाटक ही मराठी रंगभूमीला रामप्रहरी पडलेले एक सुखद स्वप्न होय.
संगीत : मा. दीनानाथ कोल्हापुरे
१
२१-२-१९२२. (राग : यमन, ताल : त्रिवट)
आज तव गडे । सुख मला । नृपरमणीं-वैभवीं नोहे ।
जरि पति मानी । गुण-गण वानी । मनिचें जाणी ॥धृ०॥
सदनभार । समज अनिवार । हुरहुर थोर झुरवी हे ह्रदय सतत ॥
२
(चाल : गजल)
चाले वसंत राजा । आस्ते कदम मुलाजा ॥
संगे जनानि फौजा । रंगेल ढंग मौजा ॥धृ०॥
सरकार रावरंभा । शृंगार करित ताबा ।
कार्या इथे न थारा । वर्दी न अर्जदारा ॥
३
(राग : देशी, ताल : त्रिवट)
भाव भला भजकाचा । साधी प्रभुदया ॥धृ०॥
कायिक वाचिक नच याग निभावे । ह्रदयि रिघे दिवे ॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP