संगीत कृष्णार्जुन युद्ध
मराठी संगीत नाटक ही मराठी रंगभूमीला रामप्रहरी पडलेले एक सुखद स्वप्न होय.
(१९२५). संगीत : वझेबुवा
१
(राग : मांड, ताल : केरवा)
गाढ झोप घेसी करुणाघना । सोडी तियेते ॥धृ०॥
स्थापुनि अहिशिरीं । विश्वकटाहा । पेटविले कलि कानानी ॥
घना । सोडी जलांते ॥१॥
२
(राग : सिंध भैरवी, ताल : एक्का)
हे अति नवल होत । कल्पांती श्रुत न दृष्ट ॥धृ०॥
शेष बघे उडु गगनीं । शिरिं तारा धरि धरणी ।
हिम पेटवी गिरी पडता । ग्रासि शिशुसि माता ॥
३
(राग : जिल्हा, ताल : त्रिवट)
जा हरिला झणि वदा । जी मम अपकीर्ति हो जगीं ती ॥धृ०॥
सुज्ञ तुम्ही या नणंदा जावा । मुठित ठेवता नवर्या भावां ।
मग न कलह कां मिटला जावा ॥
४
(राग : जिल्हा, ताल : केरवा)
अंत न लागे लव कवणाही । वेड जगासी लाविसि पाही ।
प्रेम द्वेष तुला सम असती । खेळ खेळण्या दोही ॥१॥
लीलाप्रिय तू उपहासाच्या । बुडविसी मूढा डोही ॥२॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP