संगीत मदनाची मंजिरी
मराठी संगीत नाटक ही मराठी रंगभूमीला रामप्रहरी पडलेले एक सुखद स्वप्न होय.
( २३-३-१९६५). संगीत : राम मराठे, प्रभाकर भालेकर
१
मजला कुठे न थारा मजला नसे निवारा ।
करिते क्षणाक्षणाला दुर्दैव घोर मारा ।
निष्प्रेम जीविताची नौका बुडून गेली
संसारसागरी या ना सापडे किनारा
वीणेवरी मनाच्या आघात जाहलासे
मांगल्यभावनेच्या गेल्या तुटून तारा ।
२
मानिनी । सोड तुला अभिमान ॥धृ०॥
रूप संपदा दो दिवसाची
यौवनासवे सरावयाची
तिने धुंद होउनी करिसि का प्रणयाचा अपमान ?
चिरंजीवनी प्रेम भावना
दूर करी जी मलिन वासना
मान लववुनी तिचा करी गे, सखये तू सन्मान
३
अंतरिल तुज अंबिका कशाला धरिसी मनिं शंका !
शंकर मनरंजि हरितसे भवपातक पंका
दयावती जी सहज उद्धरी, हीन दीन रंका
कळिकाळावर जिचा धडधडा झडे विजय डंका !
४
अंग अंग तव अनंग खुलवि मदन-मंजिरी
देवटूत याचितात सुखद-संग माधुरी ॥धृ०॥
मंद मंद हसित-लसित
वदन प्रणयरंग सदन
रूपरंग बहर तुझा कहर करी अंतरीं.
तव यौवन रंगदार
चाल तुझी डौलदार
जादुभरे नैनबाण हरिति प्राण सुंदरी.
५
ये मौसम रंगीन रंगीन शाम
सनमने दिया जो मुहब्बतसे जाम ॥धृ०॥
जादूभरी लुत्फे-मय् क्या कहूँ ?
हुये हाय तेरी नजरके गुलाम !
हमें आसमाँसे है आया पयाम
खुदा मेहरबाँ है, न सागरको थाम ॥
ओ मीनाकुमारी ! तुझे है कसम
पिलाके भुलां दे ये दुनियाके गम
बहुत प्यास है, और जवानी है कम
जुबाँ पे है दिलदार तेराहि नाम !
सफरमे न आयेगा ऐसा मुकाम ।
करते फरिश्ते है झुकके सलाम ।
६
ऋतुराज आज वनि आला, ऋतुराज आज मनि आला ॥धृ०॥
नव सुमनांचा, नवकलिकांचा बहर घेउनी आला ॥
कुंज कुंज अलि-पुंज गुंजने बघ झंकारित झाला !
सुरस रागिणी नव प्रणयाची कोकिळ छेडित आला !
नवथर सुंदर शीतल निर्झर त्यात रंगुनी गेला !
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP