संगीत सत्याग्रह
मराठी संगीत नाटक ही मराठी रंगभूमीला रामप्रहरी पडलेले एक सुखद स्वप्न होय.
(१९-१२-१९३३). संगीत : शंकरराव सरनाईक
१
(ताल : तिलंग, ताल : केरवा)
आनंदे विश्व रंगले । नारदा । आशा फुले जीव डोले ॥धृ०॥
शुभ बोला हा मला । संजीवनीसा गमला । मृत जीवनी ह्या ॥
२
(राग : मिश्र पिलु, ताल : त्रिताल)
बाळा । कां रुचला अबोला ?
सुचत कसा नवलाचा चाळा ? ॥धृ०॥
हांसवी नाचवि ह्या जीवा । ह्रदयिच्या राजिवा ।
सोडुनि रुसवा । बोल सुधेच्या मंजुळा बोला ॥
३
(राग : पिलु मिश्र, ताल : धुमाळी)
कुठे गुंतला ? देवा । कशि नाही लवहि करुणा ? दयाळा ॥धृ०॥
सत्याग्रही बाळ हा । तपोनिधीच महा धृवबाळासि
दर्शन द्या ह्या काला ॥
४
(राग : वसंत, ताल : त्रिवट)
ॐ नमो भगवते वासुदेवाय ।
मंत्र सोपा जपा मोक्षदायी महा ॥धृ०॥
योग याग खरतपादि । विफल सकल ह्या उपाधि ।
भक्तियोग सहज साधि। मुक्तिलाभजगतीं हा ॥
N/A
References : N/A
Last Updated : April 14, 2014
TOP