मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|नाट्यसंगीत|
संगीत युगांतर

संगीत युगांतर

मराठी संगीत नाटक ही मराठी रंगभूमीला रामप्रहरी पडलेले एक सुखद स्वप्न होय.


(७-२-१९३१). संगीत : हिराबाई, सवाई गंधर्व, सुरेशबाबू, केशवराव भोळे


(राग : यमन, ताल : एकताल)
जनमानसमंदिरात । विलसो रुचिरा प्रशांत ।
मति स्वयंप्रकाशवती । मंगला युगान्तरांत ॥धृ०॥
कुलसाधित वैभवात । न दिसो महती कुणास ।
धृति सेवा, कृति गुणांहि । लाभो प्रभुता जनात ॥१॥


(राग : काफी, ताल : त्रिताल)
ललना दिसे सुप्रभाती । नयना तुझ्या दर्पणांती ।
अलकांचिया पाशा धरिता । मृदू त्या होतीं ॥धृ०॥
हसतमुखी ती सन्मुखी राही । लाजुनी वाट पाहीं ॥१॥


(राग : पटदीप, ताल : झपताल)
अधिर मन बावरे, घेइ आंदोलने । विविध भावांवरि प्रेमशंकागुणें ॥धृ०॥
दयित ह्रदयांतले अणु जरी लाभलें । स्थल, विसावले मन ।
कान्तागुणचिंतने ॥१॥


(राग : काफी देस, ताल : एकताल)
किति सुखकर हा भास । ह्र्दयांतर करि उलसित । जाय विरुनि
सकल ताप मनिचा । हा गोड घ्यास ॥धृ०॥
भ्रमचि रुचिर वाटत हा । जागृति विषसमचि गमत ।
मीलन जसि होत मधुर । जाय विरुनि ॥१॥


(राग : मांड, ताल : एकताल)
घेई विहगसम भरारि । मानस हें भारी ॥धृ०॥
उन्मादक गीताचे । छत सुंदर पसरावे ।
वाटे या क्षणि मनास । मन वेडे बाई ॥१॥


पदपंकजाते प्रभुच्या वरोनी । मिळतो विसावा भयशंकिताते ॥धृ०॥
नृपती नृपांचा परमेश साचा । झणि देह अभया शरणांगताते ॥१॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP