संगीत अर्ध्या वाटेवर
मराठी संगीत नाटक ही मराठी रंगभूमीला रामप्रहरी पडलेले एक सुखद स्वप्न होय.
(५-५-१९४५). संगीत : डी. पी. कोरगावकर, श्रीधर पार्सेकर
१
रंग उधळले, खेळ खेळले
मनिचे भव रंगले ह्रदयीं दीप उजळले
क्षणभरी विश्व नाचलें
परि हें काय जाहलें
नकले सांगु मी कुणा, कुणा, कुणा
फुलला चोर नभी तेजाळ हंसत मनी
लज्जित रजनी उभी निजरूपा ती बघुनी
तेजगुणी, चंद्रमणी, उजळी दिशा मोहवी वसुधा ही
निशा अशी अधिर मन बावरे पुन्हा पुन्हा
२
मानसींच्या या मंदिरी लाविल्या ज्योती
उधळित कोणी सांग ही सुमनांची रास !
मंद मंद दिपविल हा प्रणयाचा दीप
चालू आम्ही पथ हांसत नाचत
घालुनि प्रेमे हात गळा
राहु दे दुनिया मागे, जाऊ चल ग पुढे
गाठुंया तें शिखर आमुचे वेगे वेगे !
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP